crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
परभणी: परभणी येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने ओबीसी आरक्षण गमावल्याच्या भीतीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव कुमार नारायण आघाव असे असून तो केवळ २२ वर्षाचा आहे. या तरुणाने शेतात जात लिंबाच्या झाडाला गळफास घेतला आहे. त्याच्याजवळ एक चिठ्ठी सापडली आहे.
Jalgaon News: अजित पवारांच्या निकटवर्तीयाला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?
नेमकं काय घडलं?
या घटनेची माहिती मिळताच गजानन माणिकराव दराडे यांनी बोरी पोलिसांना याबाबत माहिती कळवली. आडगाव दराडे येथील मेव्हणा कुमार नारायणराव आघाव (२२) परभणीहून गावाकडे जातो म्हणून २३ सप्टेंबरला गावाकडे निघाला. घरी आल्यानंतर आईला शेताकडे जातो असे म्हणून गेला तो रात्री उशिरापर्यंत परतला नाही. म्हणून घरच्यांनी शोध सुरू केला असता शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या अवस्थेतील मृतदेह आढळला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपासणी केली असता कुमार आघावच्या खिशात चिठ्ठी आढळली.
चिठ्ठी काय?
ओबीसी आरक्षण गेलं असं मी समाजात ऐकत या होतो त्यामुळे माझी मनस्थिती बरोबर राहिली नव्हती. माझ्या डोक्यात सतत तोच विचार चालू होता. आमच्या तरुण बांधवांचे खुप मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे मी माझ्या ओबीसी समाजासाठी माझे जीवन संपवून टाकत आहे. असे चिठ्ठीत लिहिले होते.
एकुलता एक भाऊ
जिंतूरच्या बोरी पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कुमार आघाव हा त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता, त्याला ४ बहिणी आहेत. त्यामुळे आघाव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या कुटुंबियाना सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकरी करत आहेत.
अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन् फूस लावून पळवलं
परभणी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी रोशन प्रकाश डोंगरे (रा. सेलू) याच्याविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.11) दुपारच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रोशन याचे मुलीच्या पालकांशी संबंध असल्याने त्याचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. या ओळखीचा फायदा घेत त्याने मुलीला आपल्या प्रेमजाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवत त्याने बुधवारी (दि.10) दुपारी दीड वाजताच्या सुमारास मुलीचे आई-वडील उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात गेले असताना मुलीला घरातून फूस लावून पळवून नेले. मुलीने घरातील सोन्याचा गोफ, कानातील रिंग तसेच तिच्या नावावर जमा असलेल्या स्टेट बँक खात्यातील तब्बल ६० हजार रुपये काढून घेत आरोपीसोबत पलायन केले.
दरम्यान, आई-वडील परत आल्यानंतर मुलगी घरात नसल्याचे लक्षात येताच त्यांनी गावात शोध घेतला. त्यावेळी मुलगी रोशनसोबत गेल्याचे उघड झाले. यानंतर मुलीच्या वडिलांनी सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून गुरुवारी (दि. ११) दुपारी ३ वाजता पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
बँकेत नोकरीच्या नावाने अनेकांना गंडा; तब्बल 16 लाखांना फसवले, अवघ्या आठ महिन्यांत…