धक्कादायक ! 21 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; 14 महिन्यांपू्र्वीच झाला होता विवाह
छत्रपती संभाजीनगर : पतीसोबत झालेल्या वादानंतर एका 23 वर्षीय महिलेने गळफास घेऊन जीवन संपवले. ही दुर्दैवी घटना पिसादेवी भागात घडली. गळफासामुळे जखमी असलेल्या महिलेचा गुरूवारी (दि.4) मध्यरात्री अडीचच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आरती सचिन शिंदे (वय २३ रा. पळशी ता. संभाजीनगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरतीचा पती सचिन शिंदे एका खाजगी कंपनीत नोकरी करत असून, तो कामावर गेल्याने कौटुंबिक कारणावरून आरतीने गळफास घेतला. हा प्रकार तिच्या घरातील सदस्यांना कळल्यानंतर त्यांनी तात्काळ फासावरून खाली उतरवत तिला बेशुद्धावस्थेत दाखल केले. गुरूवारी मध्यरात्री तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास करत आहेत.
तीन वर्षांपूर्वी झाला होता विवाह
आरतीचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. सासरच्या मंडळीसोबत नेहमी वाद होत असल्याचे आरतीच्या भावाने सांगितले. गळफास घेण्यापूर्वी तिने एलएलबीचे शिक्षण घेणाऱ्या भावाला फोन करून ‘तुझी आठवण येत आहे. तू भेटायला का आला नाहीस?’ असा शेवटचा फोन केल्याचे तिच्या भावाने सांगितले.