
गडचिरोलीमध्ये सौरपंपाची केबल चोरणारी टोळी सक्रिय
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
टोळीचा पर्दाफाश करण्यात अपयशी
आरमोरी/गडचिरोली: गत काही दिवसांपासून आरमोरी शहर परिसरातील शेतातील मोटारपंप केबल चोरीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. या वाढत्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे आधिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या यासंदर्भातील तक्रारी वाढल्या आहेत. यावरून तालुक्यात या अज्ञात चोरट्यांची टोळीच सक्रिय असल्याचे सिद्ध होत असताना टोळीचा पर्दाफाश करण्यात मात्र पोलिस दलाला अद्यापही यश आले नसल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली शहरातील मंगरी नाल्यालगतच्या शेतशिवारातील काही शेतकऱ्यांच्या शेतातील सौरऊर्जा मोटारपंपाचे केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.
बोरकर या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधील शरद बोरकर हे शेतात असलेल्या धानाच्या पन्ध्राला पाणी देण्यासाठी सकाळच्या सुमारास गेले असता सौर ऊर्जा मोटारपंपाचे केवल वायर चोरट्यांनी मोटारपंपापासून कापून चोरून नेल्याचे निदर्शनास आले. लागलीच त्यांनी शेतालगतचे शेतकरी प्रकाश भोयर यांना फोन करून केबल चोरून नेल्याचे सांगितले. प्रकाश भोयर यंनी तत्काळ आपल्या शेतात जाऊन सौर ऊर्जा मोटार पंपाची पाहणी केली असता त्यांच्याही दोन मोटारपंपाची केबल कापून नेल्याचे आढळून आले त्याचप्रमाणे आजूबाजूलाच असलेल्या शेतकरी तुळशीराम भोयर, मंगला बोरकर व सुंदरा ढंगेि यांच्या शेतातील मोटारपंपाचे केबल वायर नसल्याचे दिसून आले.
चोरीचे प्रमाण वाढल्याने शेतकरी धास्तावले
१५ दिवसांपूर्वी आरमोरीपासून ५ किमी अंतरावरील शिवनी येथील शेतकऱ्यांची सौर ऊर्जा मोटारपंप काढून निप्पल जवळून कापून केबलसह चोरी केली होती. ही घटना ताजी असतानाच शहरालगतच्या शेतशिवारातही चोरीचे प्रमाण वाढल्याने शेतकरी धास्तावले. आरमोरी परिसरातील शेतकऱ्यांच्या विद्युतवर चालणाऱ्या मोटारपंप चोरीच्या घटना अनेकदा घडलेल्या आहेत. आता सौरपंपसुद्धा चोरी जात आहेत. तालुक्यात मोटारपंपाची चोरणारी टोळी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या टोळीचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
तब्बल 11 लाखांची फसवणूक
रत्नागिरी तालुक्यातील करबुडे-मासेबाव येथील तरुण रिक्षा मॅकेनिकला आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून ११ लाख ३९ हजार ५११ रुपयांच्ची तीन संशयितांना फसवणूक केली. तीन संशयितांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यामध्ये एका अनोळखी महिलेचा सामावेश आहे. समीर महस्के (पुर्ण नाव माहित नाही) जनता सहकारी बँक क्लार्क नगर ठाणे, येथील बैंक खातेधारक रोहीत प्रकाश म्हसकर व अन्य अनोळखी महिला असे संशयित आहेत.
Crime News: नोकरीचे अमिष दाखवले अन् तब्बल 11 लाखांची फसवणूक; कुठे घडला हा प्रकार?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी उमेश धनावडे (वय ३३, रा. रिक्षा मॅकेनिक, रा. करबुडे-मासेबाव, रत्नागिरी) संशयित समीर म्हस्के याने त्यांचा भाऊ तुषार धनावडे तसेच अन्य मित्र अजय विजय गोवळकर यांना आरोग्य विभागामध्ये नोकरीला लावतो, त्यासाठी पीस भरावयाचे लागतील असे सांगतिले.