Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhayander Crime : ऑनलाईन फसवणूक टोळीचा पर्दाफाश; गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कारवाई

गोल्ड ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष–4 ने पर्दाफाश केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 06, 2026 | 05:21 PM
Bhayander Crime : ऑनलाईन फसवणूक टोळीचा पर्दाफाश; गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कारवाई
Follow Us
Close
Follow Us:
  • ऑनलाईन फसवणूक टोळीचा पर्दाफाश
  • गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कारवाई
भाईंदर / विजय काते : मॅट्रीमोनिअल साईट तसेच विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधून विश्वास संपादन करत ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंग व गोल्ड ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष–4 ने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून देशभरातील तब्बल 51 गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग उघड झाला आहे.

दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील शिवसाई रेसिडेन्सी लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डिंग येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत रोशनकुमार सिथारामा शेट्टी, साबिर मोहम्मद खान, सनद संजीव दास, राहुलकुमार उर्फ कैलाश राकेशकुमार आणि आमिर करम शेर खान हे आरोपी ऑनलाईन फसवणुकीतून मिळालेले पैसे अवैधरीत्या बँक खात्यांत स्वीकारत असल्याचे आढळून आले.

तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपी विविध मॅट्रीमोनिअल साईट्स व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून नागरिकांशी मैत्री करून विश्वास संपादन करायचे. त्यानंतर बनावट वेबसाईट्सच्या लिंक्स पाठवून फॉरेक्स व गोल्ड ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळेल, असे भासवून वेगवेगळ्या बँक खात्यांत पैसे भरण्यास भाग पाडले जात होते. या पद्धतीने देशभरातील अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 4 कडे वर्ग करण्यात आला. पुढील तपासात अभिषेक अनिल नारकर ऊर्फ गोपाळ व मोहम्मद रशिद फकीर मोहम्मद बलोच ऊर्फ लक्की यांनाही अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींच्या बँक खात्यांच्या तपासातून महाराष्ट्रासह मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, जळगाव, धुळे तसेच मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमधील विविध सायबर पोलीस ठाण्यांत दाखल असलेले 51 गुन्हे उघडकीस आले आहेत.

Nashik Crime: पोटच्या मुलानेच केली जन्मदात्या वडिलांची हत्या; दारूच्या वादातून केली हत्या

आतापर्यंतच्या तपासात देशभरातील सामान्य नागरिकांची 200 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे समोर आले असून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार भारताबाहेरून कामकाज करत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. अटक आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष–4चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Pune Crime: ‘वडील गंभीर आहेत’ आणि…; बनावट इमर्जन्सी कॉलने डॉक्टरांना बोलावलं अन् चाकूच्या धाकात लुटलं

Web Title: Bhayander crime online fraud gang exposed crime detection branch takes major action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

Crime News: सौरपंपाची केबल चोरणारी टोळी सक्रिय; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
1

Crime News: सौरपंपाची केबल चोरणारी टोळी सक्रिय; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Crime News: नोकरीचे अमिष दाखवले अन् तब्बल 11 लाखांची फसवणूक; कुठे घडला हा प्रकार?
2

Crime News: नोकरीचे अमिष दाखवले अन् तब्बल 11 लाखांची फसवणूक; कुठे घडला हा प्रकार?

खळबळजनक ! विवाहित महिलेला इन्स्टाग्रामवर ‘तो’ व्हिडिओ पाठवला अन् नंतर…
3

खळबळजनक ! विवाहित महिलेला इन्स्टाग्रामवर ‘तो’ व्हिडिओ पाठवला अन् नंतर…

धाकट्या भावाने केला थोरल्या भावाचा खून; झोपेत असताना धारदार शस्त्राने वार केला अन्…
4

धाकट्या भावाने केला थोरल्या भावाचा खून; झोपेत असताना धारदार शस्त्राने वार केला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.