Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीड पुन्हा हादरलं ! 25 वर्षीय तरुणाला दोन दिवस अमानुष मारहाण; शरीर काळं-निळं पडेपर्यंत मारलं, नंतर झाला मृत्यू

पोलिस तपासात एकूण 10 जणांकडून विकासला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बनसोडेला अमानुष मारहाण झाल्याचे समजताच त्यांनी तपास सुरू केला. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 17, 2025 | 07:20 AM
पत्नीच्या हत्येसाठी पतीला भोगावा लागला तुरुंगवास

पत्नीच्या हत्येसाठी पतीला भोगावा लागला तुरुंगवास

Follow Us
Follow Us:

बीड : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात बीडमधून गुन्हेगारीची सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत. नुकत्याच एका घटनेमुळे बीड पुन्हा हादरले. प्रेम प्रकरणावरून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. दोन दिवस या युवकाला घराच्या मागे असलेल्या झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

विकास बनसोडे हा 25 वषीय तरूण जालन्याचा रहिवासी होता. तो आरोपी भाऊसाहेब क्षीरसागर याच्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला होता. विकासचे क्षीरसागर याच्या मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. याची माहिती क्षीरसागरला मिळताच त्याने विकासला घराच्या मागे असलेल्या झाडाला बांधून मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

हत्येनंतर विकासच्या कुटुंबियांना केला फोन

हत्येनंतर भाऊसाहेब क्षीरसागरने विकासच्या कुटुंबीयांना फोन करून ताबडतोब तुम्ही आमच्या घरी निघून, या असे सांगितले. त्यांच्या संभाषणाचा ऑडिओ क्लीप व्हायरल झाला आहे. यामध्ये क्षीरसागर विकासच्या कुटुंबीयांना सांगतो की, ‘तुम्ही नवरा-बायको लवकरात लवकर या. तुमचे जे कुणी असेल त्याला घेऊन या. इकडे आल्यावर तुम्हाला पराक्रम सांगतो. अर्जंटमध्ये या. जास्त टाईमपास करू नका. तुमचा लेक माझ्याकडे आहे. तुम्ही लवकर आमच्या घरी या’, असे सांगितले होते.

शरीर काळे-निळे पडेपर्यंत मारहाण

पोलिस तपासात एकूण 10 जणांकडून विकासला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बनसोडेला अमानुष मारहाण झाल्याचे समजताच त्यांनी तपास सुरू केला. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. विकासचे शरीर काळे-निळे पडेपर्यंत मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात 10 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी हानकुडे यांनी दिली आहे.

आरोपींना फाशी द्या, अन्यथा आम्हीच फाशी घेऊ

विकास बन‌सोडे याचा मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर त्याचे आई-वडिल व नातेवाईक घुमरी पिंपरी (ता. आष्टी) येथे आले आहेत. कडा येथील आरोग्य केंद्राच्या बाहेर आई-वडील आणि नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. मुलाचा जीव घेणाऱ्या मारेकऱ्याला फाशी द्या, अन्यथा आम्ही दोघे नवरा-बायको इथेच फाशी घेऊ, अशा शब्दात बनसोडे दाम्पत्याने आक्रोश केला.

दहा जणांवर गुन्हा दाखल

भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर, बाबासाहेब भानुदास क्षीरसागर, स्वाती भाऊसाहेब क्षीरसागर, सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर, संकेत भाऊसाहेब क्षीरसागर (सर्व रा. पिंपरी घुमरी ता. आष्टी जि. बीड), संभाजी झांबरे, सचिन भवर, भाऊसाहेब क्षीरसागर, सुशांत शिंदे, बापुराव शिंदे या दहा आरोपींचा या घटनेत सहभाग आहे.

Web Title: 25 year old youth brutally beaten for two days in beed nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 07:16 AM

Topics:  

  • Beed Crime
  • crime news

संबंधित बातम्या

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
1

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
2

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
3

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर
4

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.