Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दर्यापूरच्या आठवडी बाजारात रक्तरंजित थरार! 60 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

दर्यापूरंधील आठवडी बाजार परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास घडलेल्या हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गजानन खेडकर (वय ६०) यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 12, 2026 | 11:42 AM
दर्यापूरच्या आठवडी बाजारात रक्तरंजित थरार! 60 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

दर्यापूरच्या आठवडी बाजारात रक्तरंजित थरार! 60 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

Follow Us
Follow Us:
  • दर्यापूरच्या आठवडी बाजारात गजानन खेडकर यांची हत्या
  • जुन्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक संशय
  • येवदा पोलिसांसह फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू
दर्यापूर : दर्यापूरंधील आठवडी बाजार परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास घडलेल्या हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गजानन खेडकर (वय ६०) यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात अवधूत खोडके यांचे नाव संशयित आरोपी म्हणून समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास सुरू आहे.

 

घटनेची माहिती मिळताच येवदा पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रफुल्ल गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया राबवली. आठवडी बाजार हा परिसरातील नागरिकांच्या गर्दीचा ठिकाण असल्याने सायंकाळच्या वेळेत घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. भरवस्तीत आणि बाजाराच्या ठिकाणी घडलेल्या या गंभीर घटनेमुळे परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास येवदा पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रफुल्ल गाडेकर करीत आहेत. पोलिसांकडून घटनास्थळावरील पुरावे, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर बाबींच्या आधारे तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे दर्यापूर परिसरात एकच चर्चा सुरू असून, पोलिस तपासातून काय निष्पन्न होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : दिवाळीच्या दिवशी काळाचा घाला! भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

नागपुरात भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावरच हल्ला

मित्रासोबत सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेले देवेंद्र उत्तमराव सावरकर (वय ५०, रा. न्यू पँथरनगर, नंदनवन) यांच्यावर दोघांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आधी मारहाण केली आणि नंतर लोखंडी कडा व दगडाने वार केल्याने त्यांच्या पायाचे हाड फॅक्चर झाले. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अमन उत्तम मेश्राम (वय २५, रा. पडोळेनगर, वाठोडा रोड) आणि अश्लेष शिवशंकर अडिकने (वय २९) अशी आरोपींची नावे आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दर्यापूर येथे हत्या कोणाची झाली?

    Ans: आठवडी बाजार परिसरात गजानन खेडकर (वय ६०) यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • Que: या हत्येप्रकरणी कोणाचे नाव संशयित आरोपी म्हणून समोर आले आहे?

    Ans: अवधूत खोडके यांचे नाव संशयित आरोपी म्हणून समोर आले आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

  • Que: या हत्येचा तपास कोण करीत आहेत?

    Ans: येवदा पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रफुल्ल गाडेकर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Web Title: An incident involving the murder of an individual has taken place at the weekly market in daryapur nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Wardha Crime News: वर्ध्यात दिवाळीच्या सणात रक्तरंजित घटना! जुन्या वादातून एकाची हत्या; आरोपीला अटक
1

Wardha Crime News: वर्ध्यात दिवाळीच्या सणात रक्तरंजित घटना! जुन्या वादातून एकाची हत्या; आरोपीला अटक

आधी दुचाकीवर लिफ्ट दिली, नंतर जंगलात दाखवली लुटारूंची भीती; वृद्ध महिलेचे दागिने घेऊन आरोपी फरार
2

आधी दुचाकीवर लिफ्ट दिली, नंतर जंगलात दाखवली लुटारूंची भीती; वृद्ध महिलेचे दागिने घेऊन आरोपी फरार

दिवाळीच्या फटाक्यांवरून तुफान राडा! तरुणीचा विनयभंग अन् कुटुंबीयांना मारहाण; नेमकं काय घडलं?
3

दिवाळीच्या फटाक्यांवरून तुफान राडा! तरुणीचा विनयभंग अन् कुटुंबीयांना मारहाण; नेमकं काय घडलं?

नांदुरामध्ये दरोडेखोरांचा थरार! इंडस टॉवरवर चोरी करताना अलार्म वाजला; सुरक्षा रक्षकांनी तिघांना पकडले
4

नांदुरामध्ये दरोडेखोरांचा थरार! इंडस टॉवरवर चोरी करताना अलार्म वाजला; सुरक्षा रक्षकांनी तिघांना पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.