
मोबाईलच्या हट्टापायी मुलाचे टोकाचे पाऊल; लोखंडी पाइपने वडिलांची केली हत्या
मोबाईलच्या पैशांवरून झाला वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास येवती येथील डोंबाळे वस्तीवर ही घटना घडली आहे. आरोपी श्रीशैल याने मोबाईल खरेदी करण्यासाठी वडील खंडू डोंबाळे यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. याच कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. पैसे देण्यास नकार मिळाल्याने आरोपी मुलाने वडिलांशी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रागाच्या भरात त्याने लोखंडी पाइपने वडिलांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात खंडू डोंबाळे गंभीर जखमी झाले. मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला.
पत्नीच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल
या घटनेनंतर मृताची पत्नी खुरेखा खंडू डोंबाळे (वय ५०) यांनी ११ नोव्हेंबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी श्रीशैल ऊर्फ बबलू डोंबाळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मोबाईल खरेदीसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून मुलाने जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याने येवती परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे कौटुंबिक वादातून घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.
नागपुरात भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावरच हल्ला
मित्रासोबत सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेले देवेंद्र उत्तमराव सावरकर (वय ५०, रा. न्यू पँथरनगर, नंदनवन) यांच्यावर दोघांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आधी मारहाण केली आणि नंतर लोखंडी कडा व दगडाने वार केल्याने त्यांच्या पायाचे हाड फॅक्चर झाले. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अमन उत्तम मेश्राम (वय २५, रा. पडोळेनगर, वाठोडा रोड) आणि अश्लेष शिवशंकर अडिकने (वय २९) अशी आरोपींची नावे आहेत.
Ans: श्रीशैल ऊर्फ बबलू खंडू डोंबाळे (वय २९) याच्यावर वडील खंडू डोंबाळे यांच्या हत्येचा आरोप आहे.
Ans: मोबाईल खरेदी करण्यासाठी पैसे न दिल्याने वडील आणि मुलामध्ये वाद झाला. त्यातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Ans: नळदुर्ग पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.