Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त; भाजप युवा मोर्चा पदाधिकारीसह सहा जणांना अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

नागपूरच्या काटोलमध्ये एनडीपीएस सेलने 34 किलो गांजा जप्त करून 6 आरोपींना अटक केली. भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाचा सहभाग उघड झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ. गांजा ओडिशातून आणला जात होता

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 26, 2025 | 10:35 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 34 किलो गांजा जप्त, 17 लाखांचा मुद्देमाल ताब्यात.
  • आरोपी खोलीत “नारळ व्यवसाय” आडून गांजा साठवत होते.
  • भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्यासह 6 जण अटक; एक वाहनचालक फरार.
नागपूर: नागपूरच्या काटोल तालुक्यात अमली पदार्थविरोधी पथकाला मोठे यश मिळाले आहे. एनडीपीएस सेल आणि काटोल पोलिसांनी संयुक्त रित्या कारवाई करून तब्बल 34 किलो गांजा जप्त केला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाचा सहभाग समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

गांजा कुठे आणि कसा लपवला होता?

आरोपींनी धंतोली येथील श्रीकांत देवते यांच्या घरातील एका खोलीचा वापर “नारळ व्यवसायाचा माल” ठेवण्यासाठी असल्याचे भासवून केला. मात्र प्रत्यक्षात ही खोली गांजाचा साठा व वितरण केंद्र म्हणून वापरली जात होती. आरोपी अधूनमधून या खोलीत राहात, ज्यामुळे कोणालाही संशय येणार नाही असे वातावरण त्यांनी तयार केले होते.

कारवाई कशी झाली?

सोमवारी मध्यरात्री समीर, सचिन आणि छगन हे तिघेही खोलीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पहाटे सापळा रचून पोलिसांनी रेड केली आणि सर्वांना घटनास्थळी ताब्यात घेतले.

या कारवाईत पोलिसांनीएमएच 40 डीसी 0093 क्रमांकाची बुलेरो पिकअप (किंमत 10 लाख), मोबाईल 45 हजार रुपयांचे,34 किलो गांजा (किंमत 6.72 लाख)
असा एकूण 17 लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडून गांजा ओडिशातील बल्लंगीर येथून आणला जात असल्याचे निष्पन्न झाले असून आणखी काही पुरवठादार जाळ्यात अडकण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

भाजप युवा मोर्चा पदाधिकारी अटक

या कारवाईतील प्रमुख आरोपी समीर राऊत हा नरखेड तालुक्यात ‘शेर भगतसिंग’ नावाने सामाजिक संघटना चालवत होता आणि मोठ्या प्रमाणात युवक त्याच्याशी जोडले गेले होते. तपासात भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि डोर्ली भांडवलकरचे सरपंच वैभव दिलीप काळे (28) यांचाही गांजा रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे समोर आले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

अटक आरोपींची नावे

  • समीर विजयराव राऊ
  • सचिन भागतवत झोड (22, रा. डोर्ली भांडवलकर)
  • छगन प्रितम चरपे (23, रा. दातेवाडी, नरखेड)
  • सुरज बाबाराव सुपटकर (25, रा. दातेवाडी, नरखेड)
  • विशाल देविदास शंभरकर (23, रा. मेंढला, नरखेड)
  • वैभव दिलीपराव काळे (28, रा. डोर्ली भांडवलकर)
  • वाहन चालक गज्जू फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सर्व आरोपींवर एनडीपीएस कायदा कलम 8(क) व 29 अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
💡

Frequently Asked Questions

  • Que: किती गांजा जप्त झाला?

    Ans: 34 किलो गांजा

  • Que: किती जणांना अटक करण्यात आली?

    Ans: भाजप युवा मोर्चा पदाधिकारीसह 6 जणांना अटक

  • Que: गांजा कुठून आणला जात होता?

    Ans: ओडिशातील बल्लंगीर येथून

Web Title: 34 kg of ganja seized in katol six people including bjp yuva morcha office bearer arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 10:35 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Nagpur News: तिरंगा फडकवणे गुन्हा झालाय का? Abhijeet Dipke यांचा मोदी सरकारवर संताप
2

Nagpur News: तिरंगा फडकवणे गुन्हा झालाय का? Abhijeet Dipke यांचा मोदी सरकारवर संताप

Nagpur News: नागपुरात भाजपाला दिलासा! अनिल सोले यांचा उमेदवारांना पाठिंबा
3

Nagpur News: नागपुरात भाजपाला दिलासा! अनिल सोले यांचा उमेदवारांना पाठिंबा

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
4

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.