crime (फोटो सौजन्य : social media)
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सतत अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं चित्र दिसत आहे. आता पुन्हा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका ४० वर्षीय नराधमाने एका ३७ वर्षीय विवाहित महिलेला धमकावत लग्नाची मागणी घालत लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नराधम आरोपीने विवाहितेवर अत्याचार केल्यानंतर तिचे फोटो आणि व्हिडीओ काढून घेतले. त्यानंतर काढलेले फोटो आणि व्हिडीओ तिच्या वडिलांना पाठवण्याची धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव टाकला. ही संतापजनक घटना पुण्यातील बिबवेवाडी परिसरात घडली आहे. पीडित महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यामध्ये याबाबतची तक्रार दाखल केली आहे.
धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पतीने तलवारीने केली पत्नीची निर्घृण हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून आरोपी नानासाहेब (पूर्ण नाव पोलीस तपासात) पीडित विवाहितेला वारंवार त्रास देत होता. नराधम आरोपीने तिच्यासोबत लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली, त्याचबरोबर तिच्यावर मानसिक दबाव टाकत राहिला, अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला धमकी दिली होती. जर तू माझ्यासोबत लग्न केले नाहीस तर मी तुझ्या कामाच्या ठिकाणी येऊन फिनाइल पिऊन आत्महत्या करेन अशी धमकी आरोपीने पीडित महिलेला दिली. या धमकीने पीडित महिला घाबरली आणि आरोपीच्या गाडीत बसून त्याच्यासोबत लॉजवर गेली, तिथे त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. त्याचवेळी आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडीओ काढले. त्याचवेळी आरोपीने तिच्यासोबत लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली. माझ्याशी लग्न कर नाहीतर हे फोटो तुझ्या वडिलांना पाठवीन असं म्हणत तिच्यावर मानसिक दबाव टाकत राहिला.
या संपूर्ण त्रासाला कंटाळून पीडित महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी नानासाहेब याच्या विरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
Accident News: एसटी बसचे गोंदिया व बेळगावमध्ये भीषण अपघात, ३ ठार, ३० हून अधिक जखमी