Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिमला मोठा दणका! 4 मालमत्तांचा ‘या’ तारखेला होणार लिलाव

दाऊदच्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी फारसे कुणी पुढे येत नसल्याचा या यंत्रणांचा अनुभव होता. मात्र २०१७ नंतर लिलाव जाहीर झाल्यानंतर प्रतिसाद मिळू लागला.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 01, 2025 | 03:57 PM
Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिमला मोठा दणका! 4 मालमत्तांचा 'या' तारखेला होणार लिलाव

Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिमला मोठा दणका! 4 मालमत्तांचा 'या' तारखेला होणार लिलाव

Follow Us
Close
Follow Us:

२० लाख आरक्षित किमतीचा भूखंड
दुकानाच्या ताब्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू
४ नोव्हेंबरला होणार पुन्हा लिलाव

खेड: अंमलीपदार्थ प्रतिबंधक तसेच तस्करी जप्त कायद्यान्वये करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या तसेच कुटुंबीयांच्या मालकीच्या चार मालमतांचा ४ नोव्हेंबल रोजी पुन्हा लिलाव जाहीर करण्यात आला आहे. या मालमत्तांच्या लिलावातून फक्त २० लाख रुपये येतील, असा अंमलबजावणी यंत्रणांचा दावा आहे.

दाऊदच्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी फारसे कुणी पुढे येत नसल्याचा या यंत्रणांचा अनुभव होता. मात्र २०१७ नंतर लिलाव जाहीर झाल्यानंतर प्रतिसाद मिळू लागला. परंतु खेडमधील या मालमत्तांच्या लिलिवाला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे पुन्हा लिलाव करण्यात येणार असून सीलबंद पत्रास निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे गोपनीयता राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. खेडमधील १७१ चौरस मीटर शेतजमिनीसह उर्वरित अनुक्रमे दहा हजार ४२० चौरस मीटर तसेच आठ हजार ९५३ चौरस मीटर भूखंडांसह दोन हजार २४० चौरस मीटर अशा २० लाख आरक्षित किमत असलेल्या भूखंडांचा लिलाव होणार आहे.

Danish Chikna : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा साथीदार दानिश चिकनाला गोव्यातून अटक, मुंबईत होती ड्रग्ज फॅक्टरी

दुकानाच्या ताब्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू

तस्करी आणि परकीय चलन नियमन (मालमत्ता जप्त करणे) म्हणजे साफेमा कायद्यानुसार ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. दाऊद कुटुंबीयांच्या मालकीच्या एका दुकानाचा प्राप्तीकर विभागाने २००१ मध्ये लिलाव केला होता. त्यावेळी कुणीही पुढे आले नाही. पुन्हा लिलाव झाला तेव्हा उत्तर प्रदेशातील एका व्यापाऱ्याने रस दाखविला. लिलावात हे दुकान त्यांनी खरेदी केले. परंतु या दुकानाचा त्यांना अद्याप ताबा मिळालेला नाही. हे दुकान दाऊदच्या हस्तकाच्या ताब्यात असून तो ताबा द्यायला तयार नाही. प्राप्तीकर विभागानेही हात वर केले आहेत. या दुकानाच्या ताब्यासाठी आता न्यायालयीन लढाई सुरु आहे. गेल्या वर्षी न्यायालयाच्याच हस्तक्षेपामुळे ही मालमत्ता सदर व्यापाऱ्याच्या नावे झाली.

मालमत्तेचे आतापर्यंत झालेले लिलाव आहेत असे

१४ नोव्हेंबर २०१७:  दक्षिण मुंबईतील तीन मालमत्तांचा लिलाव होऊन सैफी बुन्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने ११.०५ कोटीना त्या खरेदी केल्या.
९ ऑगस्ट २०१८:
मसुत्ला बिल्डिंग (अमीना मॅन्शन) सैफी बुन्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने साडेतीन कोटी रुपयांत खरेदी केली.
१० नोव्हेंबर २०२०
दाऊदचे वडिलोपार्जित घर तसेच खेडमधील सहा मालमतांचा २२.८ लाखाना लिलाव झाला.
५ जानेवारी २०२४: 
खेडमधील दाऊदच्या कुटुंबीयावा भूखंड ३.२८ लाखांना लिलावात दिल्लीतील अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केला

 

Web Title: 4 properties of dawood ibrahim to be auctioned again on november 4 khed news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 03:57 PM

Topics:  

  • crime news
  • dawood ibrahim
  • Khed

संबंधित बातम्या

कोंढापुरीत डॉक्टरांना कोयत्याच्या धाकाने लुटले; सव्वा तीन तोळ्याचे सोन्याचे दागिणे लंपास
1

कोंढापुरीत डॉक्टरांना कोयत्याच्या धाकाने लुटले; सव्वा तीन तोळ्याचे सोन्याचे दागिणे लंपास

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! खून केला अन् मग सोनसाखळी…;  कोर्टाने दिली जन्मठेपेची शिक्षा
2

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! खून केला अन् मग सोनसाखळी…; कोर्टाने दिली जन्मठेपेची शिक्षा

तासगावात अमली पदार्थविरोधात मोठी कारवाई, एकाला अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त
3

तासगावात अमली पदार्थविरोधात मोठी कारवाई, एकाला अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; जखमींचा आकडाही आला समोर
4

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; जखमींचा आकडाही आला समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.