सोलापूरमध्ये माणुसकीला काळीमा! चार महिलांकडून 7 महिन्यांच्या गर्भवतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण; महिलेची प्रकृती...
सोलापूर: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात वेळेवर उपचार न् मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान सोलापूरमध्ये देखील माणुसकीला काळिमा फसणारी घटना घडली आहे. सोलापूरमध्ये असलेल्या तुळजाई नगरमध्ये एका 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
सोलापूरमध्ये 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आणि विशेष म्हणजे चार ते 5 महिलांनीच या महिलेला मारहाण केल्याचे म्हटले जात आहे. मात्र अशी मारहाण का करण्यात आली यामागचे कारण स्पष्ट झाले नाही. मात्र या घटनेमुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
7 महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेला लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. महिलेच्या पोटावर आणि पाठीवर मारहाण केली गेली असल्याचे सांगितले जात आहे. मारहाणीत जखमी झालेल्या महिलेवर सोलापूर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. दरम्यान मारहाण करणाऱ्या महिलांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात मधली घटना काय?
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात एक गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगेशकर रूग्णालय प्रशासनाच्या प्रतिमेला सुरुंग लावणाऱ्या घटनांमुळे आणि त्यामुळे रूग्णांची होणारी गैरोसी पाहता डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे.
डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा रूग्णालय प्रशासनाला सुपूर्त केला आहे. घैसास यांनी राजीनामा देताच वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. डॉक्टर घैसास हे अत्यंत अनुभवी आणि कुशल डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. डॉक्टर घैसास यांनी रूग्णाला उपचारांसाठी अनामत रकमेची मागणी कएलोयचा आरोप त्यांच्यावर होता.
Big Breaking: मंगेशकर रूग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी डॉ. घैसास यांचा राजीनामा
वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर निर्माण झालेला ताण व त्यामुळे रूग्णालाय प्रतिमेला निर्माण होणारी हानी पाहता घैसास यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. रूग्णसेवा हे माझे प्रथम कर्तव्य असून, त्यामध्ये अडचण येऊ नये हीच माझी भूमिका असल्याचे डॉक्टर घैसास म्हणाले. सध्या मंगेशकर रूग्णालयात घडलेल्या प्रकारावर चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.