डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी दिला पदाचा राजीनामा (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात एक गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगेशकर रूग्णालय प्रशासनाच्या प्रतिमेला सुरुंग लावणाऱ्या घटनांमुळे आणि त्यामुळे रूग्णांची होणारी गैरोसी पाहता डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे.
डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा रूग्णालय प्रशासनाला सुपूर्त केला आहे. घैसास यांनी राजीनामा देताच वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. डॉक्टर घैसास हे अत्यंत अनुभवी आणि कुशल डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. डॉक्टर घैसास यांनी रूग्णाला उपचारांसाठी अनामत रकमेची मागणी कएलोयचा आरोप त्यांच्यावर होता.
वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर निर्माण झालेला ताण व त्यामुळे रूग्णालाय प्रतिमेला निर्माण होणारी हानी पाहता घैसास यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. रूग्णसेवा हे माझे प्रथम कर्तव्य असून, त्यामध्ये अडचण येऊ नये हीच माझी भूमिका असल्याचे डॉक्टर घैसास म्हणाले. सध्या मंगेशकर रूग्णालयात घडलेल्या प्रकारावर चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
भाजप आमदाराच्या ‘पीए’लाच फटका, गर्भवतीचा मृत्यू
सुशांत भिसे हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतात. त्यांची पत्नी तनिषा या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. दरम्यान अचानक रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्या तत्काळ जवळ असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या. परंतु, त्यांना क्रिटीकल परिस्थिती असून, डिपॉझिट म्हणून १० लाख रुपये भरा असे सांगितले. तरच पुढील प्रक्रिया सुरू करू म्हणून उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. त्यांनी ३ लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली. नंतर मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून रुग्णालय प्रशासनाला संपर्क देखील करण्यात आला.
Pune News: मंगेशकर रुग्णालयाच्या बेफिकरीमुळे गर्भवतीचा मृत्यू; बावनकुळे म्हणाले, “… ही तर मुघलशाही”
मात्र, तरीही रुग्णालय प्रशासनाने याबाबत काहीही पावले उचलली नाही. सकाळी ९ वाजता आलेली महिला दुपारी दोनपर्यंत त्याच ठिकाणी होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. नंतर महिला अतिरक्तस्त्राव होत असल्याने वाकड येथील एका रुग्णालयात दाखल झाली. त्याठिकाणी उपचार सुरू झाल्यानंतर महिलेला दोन जुळ्या मुली झाल्या. परंतु, मोनाली यांचा मृत्यू झाला.
मंगेशकर रूग्णालयाचा आणखी एक गैरकारभार समोर
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पुणे महापालिकेचा तब्बल 27 कोटी रुपयांचा मिळकतकर थकविल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून चालवले जाते. रुग्णालय प्रशासनाने गेल्या सहा वर्षांपासून महापालिकेला एकही रुपयाचा कर भरलेला नाही. 2019-20 पासून रुग्णालयाने मिळकतकर भरण्याचे टाळत आहे. त्यामुळे महापालिकेची तब्बल 27 कोटी 38 लाख 62 हजार 874 रुपयांची थकबाकी राहिली आहे.