13 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत नेमकं काय घडलं?
kalyan Crime News in Marathi: कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात राहणाऱ्या 13 वर्षाची एक अल्पवयीन मुलगी सोमवारी सकाळी तिच्या आईकडून दुकानातून खाऊ आणण्यासाठी वीस रुपये घेतले. पैसे घेऊन ती दुकानात गेली ,परंतु घरी परत आली नाही .आठ ते नऊ तास मुलगी घरी न आल्याने पीडित कुटुंबीयाने यासंदर्भात कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कोळशेवाडी पोलिसांनी अपहरणाच्या गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला. पोलीस या प्रकरणाच्या तपास करीत होती, दुसरीकडे मंगळवारी सकाळी कल्याण नजीक असलेल्या बापगाव परिसरात एका अल्पवयीन मुलीच्या मृत्यदेह आढळून आला.
याबाबत कोळसेवाडी पोलिसांना देखील माहिती मिळाली. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्हा बाबत तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांना घेऊन बापगाव पोहोचले. जेव्हा अल्पवयीन मुलीची डेड बॉडी वडिलांना दाखवण्यात आली वडिलांनी ही मुलगी त्यांचीच असल्याचे सांगितले. या अल्पवयीन मुलीची गडा आवळून हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तिच्यासोबत लैंगिक अत्याचार झाले आहे की नाही या संदर्भातली माहिती मुलीच्या मृतदेहाच्या शोविच्छेदनानंतर समोर येईल.
याबाबत मुलीचे वडील यांच्या स्पष्ट म्हणणं आहे की, त्यांच्या मुलीच्या अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार नंतर त्याची हत्या करण्यात आली आहे. माझा दोन लोकांवर संशय आहे मात्र याच्या तपास पोलीस करीत आहेत पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाच्या तपास करून आरोपींना अटक करावे. ज्या दुकानात माझी मुलगी खाऊ घ्यायला गेली होती त्या दुकानातून तिला घेऊन कोणी गेला आहे, त्या परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये समोर येईल. आरोपीच्या सुगावा लागू शकतो. या प्रकरणात कल्याण पोलिसांनी पाच पचक तयार करून या प्रकरणातील आरोपींच्या शोध घेत आहेत .मात्र कल्याण पूर्वेत ही घटना घडल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
या मुलीच्या काही महिन्यापूर्वी विनयभंग करण्यात आला होता. याबाबत कोळसेवाडी पोलिसांनी कारवाई केली होती मात्र मुलीच्या हत्या प्रकरणी आधीची जी घटना घडली आहे त्या घटनेशी संबंधित व्यक्तींच्या यामध्ये काही समावेश आहे का? हे पोलीस तपासात समोर येणार आहे. मुलीच्या मृतदेह स्वविच्छेदनासाठी जे जे रुग्णालय पाठवण्यात आले आहे .नक्की हत्या कशा प्रकारे केली गेली आहे. तिच्यावर काही लैंगिक अत्याचार झाला आहे का याच्या अहवाल लवकरच समोर येईल.