Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बस चालकाचा महिलेच्या दागिन्यांवर डल्ला; कोल्हापूर बसस्थानकातील प्रकार

एसटीची किरकोळ दुरूस्ती करण्यासाठी प्रवाशांना येथील मध्यवर्ती बसस्थानकावर उतरवून गेलेल्या चालकाने महिलेच्या आठ तोळे दागिन्यांवर डल्ला मारला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 28, 2024 | 12:54 PM
बस चालकाचा महिलेच्या दागिन्यांवर डल्ला; कोल्हापूर बसस्थानकातील प्रकार

बस चालकाचा महिलेच्या दागिन्यांवर डल्ला; कोल्हापूर बसस्थानकातील प्रकार

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : एसटीची किरकोळ दुरूस्ती करण्यासाठी प्रवाशांना येथील मध्यवर्ती बसस्थानकावर उतरवून गेलेल्या चालकाने महिलेच्या आठ तोळे दागिन्यांवर डल्ला मारला आहे. पोलिसांनी तातडीने तपास करत चालक सुधीर लक्ष्मण शिंदे (वय ४२, रा. समर्थगाव, जि. सातारा) याला अटक केली आहे. प्रवासी महिला राजश्री आनंदा नलवडे (वय ४०, रा. ठाणे, मूळ हुक्केरी, बेळगाव) यांनी याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, ठाणे येथून बेळगावकडे निघालेली एसटी बस सोमवारी पहाटे मध्यवर्ती बसस्थानकावर आली. एसटीची किरकोळ दुरूस्ती असल्याचे सांगून प्रवाशांना उतरविण्यात आले. यावेळी प्रवाशांचे साहित्य बसमध्येच होते. एसटी वर्कशॉपमधून काही वेळाने फलाटावर आली असता त्यात फिर्यादी राजश्री नलवडे यांची पर्स मिळून आली नाही. त्यांच्या पर्समधील सोन्याचा हार, कानातील कुड्या, वेल असे आठ तोळ्यांचे दागिने नसल्याचे लक्षात येताच त्यांनी एसटी थांबवली.

बोलण्यात विसंगतीवरुन उलगडा

दागिन्याची पर्स गेल्याने फिर्यादी नलवडे भांबावून गेल्या. त्यांनी एसटी थांबवून पोलिसांना बोलावले. शाहूपुरी पोलिसांनी बसमधील प्रवाशांकडे चौकशी केली. यानंतर वर्कशॉपमध्ये जाऊन विचारणा केली असता एसटी दुरूस्तीसाठी आलीच नसल्याचे समोर आले. पोलिसांनी चालकाकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याच्या बोलण्यात वारंवार विसंगती येत होती.

हे सुद्धा वाचा : पुणे हादरलं! भरदिवसा तरुणाचा खून; कोयत्याने सपासप वार केले अन्…

प्रश्नांचा भडीमार करताच कबुली

चालक शिंदे याच्यावर पोलिसांचा संशय बळावल्याने त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्याची कसून चौकशी करताना पोलिसांनी प्रश्नांचा भडीमार करताच त्याने चोरीची कबुली दिली. या प्रकारामुळे अन्य प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला. संशयिताला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता चालकाची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

धनकवडीतील बंद फ्लॅट फोडला

पुण्यातही चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही दिवसाखाली घराला कुलूप लावून बाहेर गावी गेल्यानंतर धनकवडीतील बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडण्यात आला आहे. चोरट्यांनी येथून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी ५० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १२ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत घडली आहे. चैतन्यनगर परिसरातील हिल व्ह्यु अपार्टमेंटमध्ये तक्रारदार राहतात. त्यांचा फ्लॅट १३ ते १४ दिवसांसाठी बंद होता.

Web Title: A bus driver has stolen a womans jewelery in kolhapur nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2024 | 12:54 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

Pune Crime : तंबाखू न दिल्याचा राग अनावर; तरुणाला लाथाबुक्क्यांनी अन् लोखंडी रॉडने मारहाण
1

Pune Crime : तंबाखू न दिल्याचा राग अनावर; तरुणाला लाथाबुक्क्यांनी अन् लोखंडी रॉडने मारहाण

कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून, मुलावरही चाकूने वार; खेड शहरातील घटनेनं खळबळ
2

कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून, मुलावरही चाकूने वार; खेड शहरातील घटनेनं खळबळ

जुना वादातून मामेभावाच्या डोक्यात हातोडा घालून खून, सोबतच्या मित्रालाही मारहाण; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
3

जुना वादातून मामेभावाच्या डोक्यात हातोडा घालून खून, सोबतच्या मित्रालाही मारहाण; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Delhi Crime: दिल्लीत लज्जास्पद घटना! 16 वर्षाच्या मुलीवर स्लीपर बसमध्ये सामूहिक बलात्कार, 47km पर्यंत घृणास्पद काम
4

Delhi Crime: दिल्लीत लज्जास्पद घटना! 16 वर्षाच्या मुलीवर स्लीपर बसमध्ये सामूहिक बलात्कार, 47km पर्यंत घृणास्पद काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.