Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका चोरीतून वाहनचोरांच्या टोळ्यांचा पर्दाफाश, तब्बल 11 आरोपींना ठोकल्या बेड्या; 33 दुचाकी जप्त

गाढेपिंपळगाव येथून चोरीला गेलेल्या एका दुचाकीच्या तपासातून छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी वाहनचोरी करणाऱ्या तीन स्वतंत्र टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. सलग कारवायांत ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 14, 2026 | 02:51 PM
एका चोरीतून वाहनचोरांच्या टोळ्यांचा पर्दाफाश, तब्बल 11 आरोपींना ठोकल्या बेड्या; 33 दुचाकी जप्त

एका चोरीतून वाहनचोरांच्या टोळ्यांचा पर्दाफाश, तब्बल 11 आरोपींना ठोकल्या बेड्या; 33 दुचाकी जप्त

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : गाढेपिंपळगाव येथून चोरीला गेलेल्या एका दुचाकीच्या तपासातून छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी वाहनचोरी करणाऱ्या तीन स्वतंत्र टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. सलग कारवायांत ११ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३३ चोरीच्या दुचाकी आणि सुमारे १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अनेक वाहनांचे चेसिस व इंजिन क्रमांक घासून पुरावे नष्ट करण्याचा आरोपींनी प्रयत्न केला होता. मात्र तांत्रिक तपास, सीसीटीएनएस प्रणाली, आरटीओ अभिलेख आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहनांची ओळख पटवत विविध पोलिस ठाण्यांतील ३३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांनी वाहनचोरी विरोधात विशेष मोहीम राबविली. विरगाव, चिकलठाणा आणि एमआयडीसी पैठण पोलिसांनी स्वतंत्र तपास करत वाहनचोरांच्या तीन टोळ्यांपर्यंत मजल मारली.

 

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी पटवली वाहनांची खरी ओळख

विरगाव पोलिसांनी सर्वाधिक १९, चिकलठाणा पोलिसांनी ८, तर एमआयडीसी पैठण पोलिसांनी ६ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. जप्त वाहनांमध्ये महागड्या दुचाकींचा समावेश आहे. तपासादरम्यान आरोपींनी चोरीच्या वाहनांचे चेसिस व इंजिन क्रमांक घासल्याचे समोर आले. मात्र वाहनांची वैशिष्ट्ये, उपलब्ध क्रमांकांचे अवशेष, आरटीओ नोंदी सीसीटीएनएस प्रणाली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी वाहनांची खरी ओळख पटवली.

या तपासातून विरगाव, वैजापूर, सिल्लोड, चिकलठाणा, शिवूर, पैठण, देवगाव रंगारी, छावणी, सातारा, सिटी चौक, सिडको, वेदांतनगर तसेच श्रीरामपूर परिसरातील वाहनचोरीचे ३३ गुन्हे उघडकीस आले. वाहनांची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी अनेक दुचाकींचे चेसिस आणि इंजिन क्रमांक घासून टाकले होते. मात्र तांत्रिक तपास, सीसीटीएनएस प्रणाली, आरटीओ अभिलेख तसेच वाहनांचे मॉडेल, रंग व इतर वैशिष्ट्यांच्या आधारे पोलिसांनी प्रत्येक वाहनाची अचूक ओळख पटवली. त्यामुळे विविध पोलिस ठाण्यांतील चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे शक्य झाले.

हे सुद्धा वाचा : मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; अँटोनी लारा कंपनीच्या एका अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या

तीन कारवायांत मोठे यश

विरगाव पोलिसांनी एका आरोपीला अटक करून १९ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. चिकलठाणा पोलिसांनी तीन आरोपींकडून ८ दुचाकी हस्तगत केल्या, तर एमआयडीसी पैठण पोलिसांनी सात आरोपींना अटक करून ६ दुचाकी जप्त केल्या. तिन्ही कारवायांत एकूण ११ आरोपी जेरबंद झाले असून, १६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

वाहनचोरी हा केवळ चोरीचा गुन्हा नसून त्यामागील संपूर्ण गुन्हेगारी साखळी उद्ध्वस्त करण्यावर ग्रामीण पोलिसांचा भर आहे. प्रत्येक प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. वाहनचोरीविरोधातील मोहीम पुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहील. – प्रकाश जाधव, जिल्हा पोलिस अधीक्षक, ग्रामीण.

Web Title: The chhatrapati sambhajinagar rural police have busted gangs of vehicle thieves

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Arrested News
  • Bike Theft
  • crime news

संबंधित बातम्या

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
1

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
2

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
3

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त
4

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.