Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Milk Adulteration Case : दूध भेसळ प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; आठ दिवसांपासून पोलिसांकडून शोध सुरु

भूम शहरातील मधुबन ट्रेडर्स येथे अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडीत दुधात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी मोठ्या प्रमाणातील व्हे पावडर व अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते. याप्रकरणातील आरोपी फरार आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 14, 2026 | 03:22 PM
दूध भेसळ प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; आठ दिवसांपासून पोलिसांकडून शोध सुरु

दूध भेसळ प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; आठ दिवसांपासून पोलिसांकडून शोध सुरु

Follow Us
Follow Us:

भूम : भूम शहरातील मधुबन ट्रेडर्स येथे अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडीत दुधात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी मोठ्या प्रमाणातील व्हे पावडर व अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी सात नामनिर्देशित आरोपींसह इतरांविरोधात भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल होऊन आठ दिवस उलटूनही एकाही मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर अन्न सुरक्षा कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल होण्यास झालेल्या विलंबामुळे आरोपींना पसार होण्याची संधी मिळाल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे कारवाईतील समन्वयावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गुन्ह्यातील काही आरोपी परिसरात खुलेआम फिरताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. तरीही त्यांना अटक होत नसल्याने पोलिसांच्या तपासाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दुधातील भेसळ हा थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर गुन्हा असल्याने या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई होणे अपेक्षित असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके नेमण्यात आल्याची माहिती समोर आली असली, तरी आठ दिवस उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे शोधमोहीम नेमकी कितपत प्रभावी आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

यासंदर्भात भूमचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जांभळे यांनी सांगितले की, आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस कोणतीही कसूर करत नाहीत. दोन-तीन तालुक्यांमध्ये आरोपी राहत असल्याची माहिती मिळाल्यानुसार पथके सातत्याने पाठवली जात आहेत. मात्र, आम्ही पोहोचण्यापूर्वी आरोपी तेथून निघून जात आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून गुन्हा दाखल होण्यास झालेल्या विलंबाचाही आरोपींना फायदा झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही लवकरच सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात येईल. या पार्श्वभूमीवर सर्व आरोपींना तातडीने अटक करून दुधातील भेसळीच्या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात अशा प्रकारच्या भेसळीला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हे सुद्धा वाचा : ‘बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या, अन्यथा…’, गोर सेनेचे प्रा. संदेश चव्हाण यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा

भेसळप्रकरणी पोलिसांवर प्रश्नचिन्ह; पर्दाफाश कधी?

  • मधुबन ट्रेडर्सवर एफडीएची धाड: मोठ्या प्रमाणावर व्हे पावडर जप्त.
  • सात नामनिर्देशित आरोपींसह इतरांविरोधात गुन्हा दाखल.
  • आठ दिवस उलटूनही मुख्य आरोपी फरार.
  • गुन्हा दाखल करण्यात झालेल्या विलंबामुळे आरोपींना पसार होण्याची संधी मिळाल्याची चर्चा
  • पोलिसांची विशेष पथके शोधमोहीम राबवत असल्याचा दावा.
  • पोलिसांचे स्पष्टीकरण : लवकरच आरोपींना अटक करू.
  • नागरिकांची तातडीच्या आणि कठोर कारवाईची मागणी.

Web Title: The police are searching for the accused in the milk adulteration case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • crime news
  • milk
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…
1

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी
2

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक
3

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके
4

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.