Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! 9 मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; आधी वाद झाला अन् नंतर…

पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत मृत व्यक्तीच्या पत्नीसह 3 आरोपींना अटक केली. मृतक आणि आरोपी महिलेला एकूण 9 मुले आहेत, ज्यामध्ये आठ मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 14, 2026 | 03:20 PM
धक्कादायक ! 9 मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; आधी वाद झाला अन् नंतर...

धक्कादायक ! 9 मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; आधी वाद झाला अन् नंतर...

Follow Us
Follow Us:

बनासकांठा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता बनासकांठा जिल्ह्यात विवाहबाह्य संबंधांतून एका 9 मुलांच्या आईने आपल्या प्रेमी आणि त्याच्या साथीदारासह मिळून स्वतःच्याच पतीची कथितपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत मृत व्यक्तीच्या पत्नीसह 3 आरोपींना अटक केली. मृतक आणि आरोपी महिलेला एकूण 9 मुले आहेत, ज्यामध्ये आठ मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. यातील 4 मुलींचे लग्न झाले आहे, तर चार लहान मुली आणि एक लहान मुलगा आता आई-वडील दोघांच्याही छत्रछायेला मुकले आहेत; कारण वडिलांची हत्या झाली आहे आणि आई हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात गेली आहे. या घटनेने संपूर्ण गाव स्तब्ध झाले आहे.

गणेशपुरा गावात राहणारे गमाभाई ठाकोर हे गेल्या चार वर्षांपासून वाव-थराद परिसरात आपल्या कुटुंबासह शेतात मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. ८ जुलै रोजी त्यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा सामान्य मृत्यू वाटत होता, परंतु शवविच्छेदन अहवालात हत्येची पुष्टी झाली.

आधी वाद झाला अन् नंतर हत्याच…

तपासादरम्यान पोलिसांना समजले की, मृतक गमाभाई यांची पत्नी नर्मदा ऊर्फ नबाबेन हिचे गावातीलच प्रेमजी पटेल नावाच्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. घटनेच्या दिवशी गमाभाई शेत नांगरून उशिरा संध्याकाळी घरी परतले. घरी पोहोचल्यावर त्यांनी पत्नीला प्रेमजी पटेल आणि मुकेश ठाकोर यांच्यासोबत पाहिले. याच कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार भांडण आणि वाद सुरू झाला होता, ज्याचा शेवट या हत्येने झाला.

नवी मुंबईतही हत्या

दुसरीकडे, नवी मुंबईतील ऐरोली परिसरातून एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे. बहुचर्चित सिया-केतन हत्याकांड चर्चेत असतानाच एका विवाहित महिलेने ऑटोचालक प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची निर्घृणपणे हत्या केली. हत्येनंतर, या जोडप्याने मृतदेहाचे तीन तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी टाकले आणि जवळपास ११ महिने पोलिसांना चकमा दिला. अखेरीस, पोलिसांनी या खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावला आणि आरोपी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली.

महिलेचा छळ करण्यासाठी तिचा ई-मेल आयडी टाकला पॉर्न साईटवर ! मग अटक झाल्यावर जामीन मागण्यासाठी गेला अन्‌ न्यायाधीशांनी थेट…

Web Title: Woman murder her husband incident in banaskantha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Milk Adulteration Case : दूध भेसळ प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; आठ दिवसांपासून पोलिसांकडून शोध सुरु
1

Milk Adulteration Case : दूध भेसळ प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार; आठ दिवसांपासून पोलिसांकडून शोध सुरु

एका चोरीतून वाहनचोरांच्या टोळ्यांचा पर्दाफाश, तब्बल 11 आरोपींना ठोकल्या बेड्या; 33 दुचाकी जप्त
2

एका चोरीतून वाहनचोरांच्या टोळ्यांचा पर्दाफाश, तब्बल 11 आरोपींना ठोकल्या बेड्या; 33 दुचाकी जप्त

Uttar Pradesh Crime : पत्नीला परत मिळवायचं असेल तर आईला मारुन टाक… सासूच्या अटीवर मुलाने आईला दिले विष
3

Uttar Pradesh Crime : पत्नीला परत मिळवायचं असेल तर आईला मारुन टाक… सासूच्या अटीवर मुलाने आईला दिले विष

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; अँटोनी लारा कंपनीच्या एका अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या
4

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; अँटोनी लारा कंपनीच्या एका अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.