
किरकोळ वादातून दोघांवर चाकूहल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, दीपावलीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात “नाका बंदी”, “ऑल आऊट” आणि “कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. त्यानुसार जत पोलिस पथक मधला पारधी तांडा येथे गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेत होते. या दरम्यान आरोपी धनंजय दीपक चव्हाण मिळून आला. मात्र त्याला घेऊन जात असताना त्याचे वडील दीपक चव्हाण यांनी आरडाओरड करून जमाव जमवला आणि पोलिस कारवाईला विरोध केला. काहींनी पोलिस पथकाला घेरले, धक्काबुक्की केली आणि “पोलिसांना बघून घेतो” अशा धमक्या दिल्या. यावेळी जिजाबाई चव्हाण हिने अंमलदार अच्युतराव माने यांना हाताने आणि बुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच राकेश अप्पू काळे आणि विशाल राजेश काळे यांनी शासकीय वाहन (क्रमांक एम.एन. १० ई.ई. २४२३) वर दगडफेक करून समोरील काच व बाजूचे मिरर फोडले. त्यामुळे शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारी कामात अडथळा आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन संशयितांनी केले आहे. जमावाने पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा आणून दमदाटी केली आणि ताब्यातील आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न केला असल्याने याप्रकरणी जत पोलिसांनी बसवराज चव्हाण, राकेश अप्पू काळे, विशाल राजेश काळे, दीपक चव्हाण, कोमल दीपक चव्हाण, दीपा हनुमंत काळे, जिजाबाई रामचंद्र चव्हाण, अपर्णा धनंजय चव्हाण, विद्या दीपक चव्हाण यांच्यासह ३० ते ४० अनोळखी पारधी तांडा येथील महिला व पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विशंभर पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी तपासासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून, पुढील तपास सुरू आहे.