Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाखो रुपयांची लाचेची मागणी भोवली; सोलापुरातील डॉक्टरला रंगेहात पकडले

एक लाखाची लाच स्वीकारताना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. माधव विष्णूपंत जोशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 20, 2024 | 12:13 PM
लाखो रुपयांची लाचेची मागणी भोवली; सोलापुरातील डॉक्टरला रंगेहात पकडले

लाखो रुपयांची लाचेची मागणी भोवली; सोलापुरातील डॉक्टरला रंगेहात पकडले

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : लॅबच्या तक्रारीचा अहवाल सकारात्मक पाठण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारताना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. माधव विष्णूपंत जोशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. बुधवारी ही कारवाई करण्यात आली. सदर बझार पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती.

तक्रारदाराची लॅब आहे. त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात कार्यान्वित असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत दाखल होणाऱ्या रुग्णांचे रक्त व लघवीचे नमुने तपासून रिपोर्ट सादर करण्याचे काम निविदेद्वारे मिळालेले होते. तक्रारदाराच्या लॅबच्या विरोधात आलेला तक्रारी अर्ज पुढील चौकशीसाठी डॉ. माधव जोशी यांच्याकडे होता. या अनुषंगाने डॉ. जोशी यांनी तक्रारदारांना संपर्क साधून त्यांच्या लॅबच्या कामाबद्दल तक्रार प्राप्त झाल्याचे सांगून तुमच्या बाजूने अहवाल वरिष्ठाकडे पाठवतो, असे सांगून लॅबविरोधात अहवाल पाठवल्यास महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे उर्वरित बील निघणार नाही, अशी भीती दाखवून २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत डॉ. जोशी यांचा सहभाग आढळून आला.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे-खराडे, उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्रीराम घुगे, राजू पवार, सचिन राठोड, शाम सुरवसे यांनी ही कारवाई केली.

हे सुद्धा वाचा : शक्तिपीठविरोधात महामार्ग अडविला, वाहतूक ठप्प; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

आधी पडताळणी मग कारवाई

डॉ. जोशी यांनी तडजोडीअंती १ लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे लाच लुचपतच्या पथकाने मंगळवारी केलेल्या पडताळणी कारवाईत निष्पन्न झाले. त्यानुसार बुधवारी सापळा लावण्यात आला. यात पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपये लाच स्वीकारल्याचे लाचलुचपत पथकाने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसाखाली लोकशाहीत महत्वाचा आणि न्यायदानाचे काम करणाऱ्या स्तंभातील न्याय देणाऱ्या न्यायाधीशानेच जामीन देण्यासाठी पाच लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करुन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सातारा येथे कारवाई करून जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय लक्ष्मणराव निकम, आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी मुंबई) आणि अन्य एक असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका २४ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: A case has been registered against a doctor in solapur for demanding bribe nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 12:11 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mira Bhayander News : मराठी उद्योजिकेला धमकी? “मराठी असल्याने इथे धंदा करू शकत नाही” आरोपामुळे खळबळ
1

Mira Bhayander News : मराठी उद्योजिकेला धमकी? “मराठी असल्याने इथे धंदा करू शकत नाही” आरोपामुळे खळबळ

Matheran News: पर्यटकांच्या सोयीसाठी दस्तुरी प्रवेशद्वार मोकळे; अनधिकृत टपऱ्यांवर नगरपरिषदेचा हातोडा
2

Matheran News: पर्यटकांच्या सोयीसाठी दस्तुरी प्रवेशद्वार मोकळे; अनधिकृत टपऱ्यांवर नगरपरिषदेचा हातोडा

Weather Update: पुढील 3 दिवस 15 राज्यांत वादळी पावसाचा इशारा! IMDचे अलर्ट जारी, कुठे कसा असेल प्रभाव? जाणून घ्या सविस्तर बातमी
3

Weather Update: पुढील 3 दिवस 15 राज्यांत वादळी पावसाचा इशारा! IMDचे अलर्ट जारी, कुठे कसा असेल प्रभाव? जाणून घ्या सविस्तर बातमी

Nurses Protest: नर्सेसच्या बदल्यांवरून वाद; ‘हा फक्त नियमांचा नव्हे तर मानवी… ’; बदल्यांवर अधिकाऱ्यांचे मत
4

Nurses Protest: नर्सेसच्या बदल्यांवरून वाद; ‘हा फक्त नियमांचा नव्हे तर मानवी… ’; बदल्यांवर अधिकाऱ्यांचे मत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.