
दंश झाल्यास जखम १५ मिनिटांपर्यंत धुवा- श्वान किंवा अन्य सस्तन प्राण्याने चावा घेतल्यास जखम तातडीने वाहत्या पाण्याने आणि साबणाने किमान १५ मिनिटे स्वच्छ धुवावी. त्यानंतर विलंब न करता डॉक्टरांकडे जाऊन वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेबीज प्रतिबंधक लस आणि आवश्यकतेनुसार इम्युनोग्लोब्युलिन घ्यावे. जखमेवर माती, तेल, हळद, मिरची पावडर, लिंबू किंवा अन्य घरगुती पदार्थ लावू नयेत. जखमेवर घट्ट पट्टी बांधू नये आणि उपचार घेण्यास विलंब करू नये.
प्राणिदंशाच्या घटनांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता नागरिकांनी भटक्या प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे. लहान मुलांना कुत्रे किंवा अन्य प्राण्यांजवळ एकटे सोडू नये. प्राणिदंश झाल्यानंतर जखम लहान असली तरी त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपचार घेणे आवश्यक आहे. मांजरांच्या दंशाच्या ९९१, अन्य प्राण्यांच्या दंशाच्या ४६१ आणि माकडांच्या दंशाच्या ३७६ घटना नोंदविण्यात आल्या. सर्व प्राणिदंशाच्या घटनांचा विचार करता जानेवारीत सर्वाधिक १,२७८ घटना नोंदल्या गेल्या. त्यानंतर मार्चमध्ये १,१९५, फेब्रुवारीत १,१४९, मेमध्ये १,०९७, एप्रिलमध्ये १,०५३ आणि जूनमध्ये १,०२८ घटना नोंदविण्यात आल्या. जुलैमध्ये ७९३, ऑगस्टमध्ये ७७५ आणि सप्टेंबरमध्ये ७५६ घटना नोंदल्या गेल्या.
Bhandara News: मानव-वन्यजीव संघर्षाचा विळखा! नऊ महिन्यांत ७ जणांचा बळी; पशुधन व पीक नुकसानीचेही सावट
रेबीजचा धोका टाळण्यासाठी तातडीने वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रेबीज प्रतिबंधक लस (एआरव्ही) उपलब्ध असून ग्रामीण, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालय स्तरावर एआरव्हीसह रेबीज इम्युनोग्लोब्युलिनचा साठा ठेवण्यात आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेबीज प्रतिबंधक लसीचे वेळापत्रक पूर्ण करावे आणि आवश्यकतेनुसार इम्युनोग्लोब्युलिन घ्यावे. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये लसींचा साठा उपलब्ध ठेवण्याचे नियोजन आहे. – डॉ. नितीन कापसे जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा.
भटक्या श्वानांच्या नियंत्रणासाठी समन्वय शहरांसह ग्रामीण भागात भटक्या श्वानांचा प्रश्नही प्राणिदंशाच्या घटनांशी जोडलेला आहे. श्वानांची संख्या नियंत्रित करणे, त्यांचे लसीकरण करणे आणि प्राणिदंशाच्या घटना कमी करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय साधण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. नगर परिषदांनाही आवश्यक उपाययोजनांसाठी सूचित करण्यात आले.
💡 Frequently Asked Questions
प्रश्न 1: भंडारा जिल्ह्यात 2026 च्या पहिल्या 9 महिन्यांत किती श्वानदंशाच्या घटना नोंदल्या गेल्या?
उत्तर: जानेवारी ते सप्टेंबर 2026 या कालावधीत भंडारा जिल्ह्यात 7,296 श्वानदंशाच्या घटना नोंदविण्यात आल्या.
प्रश्न 2: कुत्रा चावल्यानंतर सर्वप्रथम काय करावे?
उत्तर: चावलेली जखम साबण आणि वाहत्या पाण्याने किमान 15 मिनिटे स्वच्छ धुवावी. त्यानंतर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेबीज प्रतिबंधक लस आणि आवश्यक असल्यास इम्युनोग्लोब्युलिन घ्यावे.
प्रश्न 3: भंडारा जिल्ह्यात रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध आहे का?
उत्तर: दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रेबीज प्रतिबंधक लस (ARV) उपलब्ध ठेवण्यात आली आहे. ग्रामीण, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालय स्तरावर आवश्यकतेनुसार रेबीज इम्युनोग्लोब्युलिनचाही साठा ठेवण्यात आला आहे.