Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

पर्वती परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी गदादे पाटील (रा. पर्वती) असे गुन्हा दाखल झालेल्या नेत्याचे नाव आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 30, 2025 | 02:04 PM
निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:
  • महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षाची जोरदार तयारी
  • राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल
  • नेमकं प्रकरण काय?
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहेत. तर येत्या १५ तारखेला मतदान होणार आहे. अशातच आता निवडणुकीच्या तोंडावरच एक मोठी बातमी पुण्यातून समोर आली आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असताना कोणतीही अधिकृत परवानगी न घेता वाहनांवर राजकीय चिन्हे, स्पीकर तसेच नेत्यांचे फोटो लावून प्रचार केल्याप्रकरणी पर्वती परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल केला आहे.

शिवाजी गदादे पाटील (रा. पर्वती) असे गुन्हा दाखल झालेल्या नेत्याचे नाव आहे. निवडणूक आयोगाच्या निरीक्षणाअंतर्गत ललिता सुदाम तमनर (वय ४३, रा. धानोरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पर्वती पायथा रोडवरील कॅनॉल पुलाजवळ, गदादे पाटील यांच्या कार्यालयासमोर हा प्रकार घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, टेम्पो आणि दोन रिक्षांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह, स्पीकर तसेच उमेदवार व अन्य राजकीय नेत्यांचे फोटो लावून प्रचार करण्यात येत होता. मात्र, यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे भारतीय दंड संहिता कलम २२३ तसेच लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ अंतर्गत कलम १२७ (अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, निवडणूक काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Web Title: A case has been registered against an ncp leader in pune just ahead of the elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 02:03 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.