Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

चार टक्के व्याजाने पाच लाख घेऊन त्याचे व्याज २ लाख १० हजार देऊनही त्रास देत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ४७ वर्षीय अनुसुचित जातीच्या महिलेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 18, 2025 | 12:30 AM
तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला...; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला...; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : चार टक्के व्याजाने पाच लाख घेऊन त्याचे व्याज २ लाख १० हजार देऊनही त्रास देत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पैसे नसतील तर बायकोला दुसर्‍या धंद्यात घाल अशा पद्धतीने अश्लिल बोलत मनास लज्जा होईल असे वर्तन केले आहे.
याप्रकरणात सावकारी करणार्‍यावर सावकारी आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल लक्ष्मण काळभोर (रा. तरवडी, रानमळा, लोणी काळभोर) आणि विशाल विठ्ठल काळभोर (रा. सिद्राम मळा, लोणी काळभोर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत ४७ वर्षीय अनुसुचित जातीच्या महिलेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २०२० ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान घडला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पतीने त्यांच्या दुकानाच्या नुतनीकरणासाठी राहुल काळभोर याच्याकडून २०२० मध्ये पाच लाख रूपये ४ टक्के व्याजाने घेतले होते. त्यांनी राहुल याचे २ लाख १० हजार व्याज स्वरूपात परत केले होते. तरी आरोपी तक्रारदाराच्या कुटुंबियांना त्रास देत होते. एकदा आरोपींनी तक्रारदारांच्या मुलाची बुलेट अडवून त्याची चावी काढून घेत पैशाची मागणी केली. त्यानंतर त्यांची कार तक्रारदाराच्या दुकानाला आडवी लावून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली.

तसेच आम्हाला शहाणपण शिकवता काय असे म्हणून अपमानीत केले. यावेळी तक्रारदाराचे पती त्यांना समजावुन सांगत असताना राहुल याने तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला दुसर्‍या धंद्यात घाल असे अश्लिल भाषेत बोलून स्त्री मनास लज्जा होईल असे कृत्य केले. या सर्व प्रकारानंतर तक्रारदार महिलेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.

टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला

पुण्यातील लोहगाव भागातून एक घटना समोर आली आहे लोहगाव भागात वैमनस्यातून टोळक्याने एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भाऊसाहेब गोपीनाथ राखपसरे (वय ४८, रा. मोझे आळी, लोहगाव) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खुनाचा प्र्रयत्न केल्याप्रकरणी नितीन सकट, निकेश पाटील, गणेश सखाराम राखपसरे, ओंकार उर्फ खंड्या खांडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A case has been registered against two people at loni kalbhor police station for alleged casteist abuse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Loni Kalbhor Police

संबंधित बातम्या

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना
1

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांवर धडक कारवाई; १०.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४७ आरोपींवर गुन्हे
2

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांवर धडक कारवाई; १०.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४७ आरोपींवर गुन्हे

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा
4

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.