हाकेंच्या अडचणी वाढल्या, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
पुणे : धनगर अणि बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केल्यानंतर आदिवासी नेत्यांना जातीवाचक शिवीगाळ केली गेली. तसेच अश्लिल भाषेत बोलले गेले. याप्रकरणी शिवीगाळ करणारे धनगर समाज युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष धनश्याम बापु हाके यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अखील भारती अदिवासी महासंघाचे अक्कलकुमा तालुक्याचे उपाध्यक्ष तुकाराम बेलव्या वळवी (44, रा. मोठी राजमोही, ता. अक्कलकुमा, जि. नंदुरबार) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार तसेच अखिल भातरी अदिवासाी महासंघाचे अध्यक्ष आमश्या पाडवी यांनी दिनांक 13 सप्टेंबर रोजी नंदुरबार येथे धनगर व बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातुन आरक्षण दिल्यावर आम्ही आदिवासी समाजासाठी सरकारमधून बाहेर पडु, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली होती. त्यावर दिनांक 14 सप्टेंबर आणि 15 सप्टेंबरला हाके यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आमदार आमश्या पाडवी, आमदार तसेच मंत्री नरहीरी झिरवळ, माजी आदिवासी विकास मंत्री वसंत पुरके यांना जातीवाचक शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. यावरुन हाके यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.
लक्ष्मण हाकेंच्या कारवर नगरमध्ये हल्ला
ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची खळबळजनक प्रकार घडला आहे. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील आरनगाव बाह्यवळण रस्त्यालगत घडली आहे. लक्ष्मण हाके हे दैत्य नांदूर (ता. पाथर्डी) येथे आयोजित ओबीसी एल्गार सभा साठी जात होते. प्रवासादरम्यान त्यांनी अहिल्यानगरजवळ नाश्ता करण्यासाठी थांबले. नाश्ता करून पुन्हा प्रवास सुरू करत असतानाच आरनगाव बाह्यवळण रस्त्यावर काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीला अडवून अचानक काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, काचा फोडण्यात आल्या आहेत. सुदैवाने हाके यांना शारीरिक इजा झाली नसल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले आहे. हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.