प्रेमात अपयश आल्याने तरुणाची आत्महत्या
11 व्या मजल्यावरून मारली उडी
ठाण्यातील धक्कादायक घटना
Crime News: प्रेम ही एक निर्मळ भावना आहे. खरे प्रेम मिळणे ही आयुष्यातील खूप महत्वाची गोष्ट आहे. मात्र तेच प्रेम न मिळाले नाही तर आपल्याला अतीव दु:ख होते. काही जण यातून सावरतात. तर काही जण चुकीचे पाऊल उचलतात. अशीच एक घटना ठाण्यात घडली आहे. एका तरुणाने आपले जीवन संपवले आहे. प्रेमामध्ये अपयश आल्यामुळे तरुणाने आपले जीवन संपवले आहे. हे प्रकरण नेमके काय आहे, ते जाणून घेऊयात.
एका तरुणाला त्याच्या प्रेमामध्ये अपयश आले. त्यामुळे त्याने 11 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. प्रेमप्रकरणात अपयश आल्याने तरुणाने आपले जीवन संपवले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यानया तरुणाने 11 व्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव दिला आहे. हा तरुण 11 व्या मजल्यावरून उडी मारत असल्याचे कळताच त्या ठिकाणी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जवळपास तास हे बचावकार्य सुरू असल्याचे समोर आले. अग्निशमन दल आणि पोलिसांनी त्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रयत्नाना यश आले नाही.
अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार
नागपूर शहरात एकाच दिवसात अत्याचाराच्या तीन वेगवेगळ्या घटना पुढे आल्या आहेत. यात अल्पवयीन मुलीवर अत्याचारासह विवाहित महिला आणि बालिकेच्या विनयभंगाचा समावेश आहे. पोलिसांनी तिन्ही प्रकरणात गुन्हा नोंदवून दोन आरोपींना अटक केली आहे. पहिली घटना कोराडी पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली.
एका तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे लैंगिक शोषण केले. यातून गर्भधारणा झाली असल्याने जबरीने तिचा गर्भपात करून घेतला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अनिकेत ताराम (वय २०) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दुसरी घटना जरीपटका ठाण्यांतर्गत उघडकीस आली. १६ वर्षीय पीडितेच्या नातेवाईकाने विनयभंग केल्याचे समोर आले. पोलिसांनी ४२ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! 16 वर्षीय विद्यार्थिनीवर तब्बल सहा महिने अत्याचार; 46 वर्षीय व्यक्तीने ॲसिड हल्ल्याची धमकी दिली अन्…
दरम्यान, आरोपी हा महिलेचा नातेवाईक आहे. त्यांच्यात वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद सुरू आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी हा जवळपास अडीच महिन्यांपासून तिला त्रास देत आहे. आक्षेपार्ह बोलून अश्लील इशारे करायचा. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.