Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: कर्ज मंजूर करुन देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ८९ लाखांची फसवणूक; CA ला अटक

फिर्यादी व्यावसायिक तरुणाच्या पत्नीला व्यवसायासाठी सात कोटी रुपयांचे कर्ज हवे होते. सनदी लेखापाल गावडे याच्याशी व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीचा परिचय होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 27, 2025 | 08:29 PM
Crime News: कर्ज मंजूर करुन देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ८९ लाखांची फसवणूक; CA ला अटक
Follow Us
Follow Us:

पुणे: कर्ज मंजूर करून देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची ८९ लाख १३ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सनदी लेखापालासह तिघांना पर्वती पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी सनदी लेखापाल सिद्धार्थ जयराम गावडे (वय ३८,रा. आंबेगाव), विकास दामोदर खुडे (वय ४३, रा. भारती विद्यापीठ परिसर, कात्रज), पंढरीनाथ बाळासाहेब साबळे (वय ४४, रा. नऱ्हे, सिंहगड रस्ता) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत याप्रकरणी एका व्यावसायिक तरुणाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार तरुण व्यावसायिक नऱ्हे परिसरात राहायला आहे. फिर्यादी व्यावसायिक तरुणाच्या पत्नीला व्यवसायासाठी सात कोटी रुपयांचे कर्ज हवे होते. सनदी लेखापाल गावडे याच्याशी व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीचा परिचय होता. गावडेने त्यांना सात कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखविले. त्यानंतर कर्ज मंजुरीसाठी काही पैसे भरावे लागतील, असे त्याने सांगितले. गावडे याने एका पतसंस्थेकडून कर्ज मंजूर करुन देतो, असे सांगितले होते, अशी माहिती पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिली.

Pune Crime : दिवसा बँक अधिकारी, रात्री मटक्याचा बुकी; पुण्यातील बँक कर्मचाऱ्यासह १७ जण अटकेत

गावडे याचे पुणे-सातारा रस्त्यावर कार्यालय आहे. गावडे याच्या खात्यावर काही रक्कम व्यावसायिक दाम्पत्याने जमा केली, तसेच त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलेच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीकडून गावडे आणि साथीदारांनी कर्ज मंजूर करुन देण्याच्या आमिषाने वेळोवेळी ८९ लाख १३ हजार रुपये घेतले.

पैसे दिल्यानंतर कर्ज मंजूर करुन दिले नाही. कर्ज न दिल्याने व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीने विचारणा केली. तेव्हा गावडे आणि साथीदारांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गावडे याच्या कार्यालयातील महिलेसह चाैघांविरुद्ध गु्न्हा दाखल केला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील बँक कर्मचाऱ्यासह १७ जण अटकेत

पुण्यातून एक बँक कर्मचाऱ्याचा धक्कदायक प्रकार समोर आलं आहे. दिवसा बँकेत नोकरी करणारा तरुण रात्री मात्र ऑनलाईन मटक्याचे आकडे घेण्याचे काम करत असल्याचे समोर आले आहे. खडक पोलिसांनी कारवाई करत बँक कर्मचाऱ्यासह आणखी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी झडती घेतली असता 562 रुपये रोख, मोबाईल फोन, असा एकूण 3562 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासात, त्याच्या मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स तपासल्यानंतर त्याने 17 वेगवेगळ्या व्यक्तींना मटक्याचे आकडे पाठवून बुकींग घेतल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: Pune police arrested ca about 89 lakhs fraud with businesmenn loan crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 08:24 PM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case
  • pune news

संबंधित बातम्या

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज
1

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…
2

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
3

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…
4

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.