Crime News: जमिनीच्या व्यवहारात फसवणूक, १२ जणांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
पिंपरी: मागासवर्गीय महिलेच्या आजीची जमीन साठेखत आणि कुलमुखत्यारपत्र करून स्वतःच्या नावावर केल्या प्रकरणी १२ जणांच्या विरोधात फसवणूक आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ डिसेंबर २००३ ते २ मार्च २०१० या कालावधीत पाईट खेड येथे घडली.
या प्रकरणी ६० वर्षीय महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोपट मारुती घनवट (७४), शंकर मारुती रौंधळ (मयत), काळुराम महादू जाधव (७५), विजय सुदाम घनवट (४४), संतोष शंकर रौंधळ (मयत), भगवान शंकर गायकवाड, चिंतामण कृष्णा रौंधळ, अरुण गुंडाळ आणि चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या आजीची खेड तालुक्यातील पाईट येथे ८६ गुंठे जमीन होती. आजीने ही जमीन शंकर रौंधळ यांना परत देण्याच्या बोलीवर १९६७ साली विक्री केली होती. त्या व्यवहारानुसार १९८९ साली शंकर रौंधळ यांनी ती जमीन फिर्यादी यांच्या वडिलांना परत दिली होती. त्याचा लेखी करार आणि मोबदला शंकर रौंधळ यांनी घेतला होता. दरम्यान शंकर रौंधळ यांचा ११ सप्टेंबर १९९७ रोजी मृत्यू झाला.
या व्यवहाराची माहिती असताना आरोपी पोपट घनवट याने शंकर रौंधळ यांच्या नावाचा तोतया व्यक्ती उभा करून त्याच्याकडून स्वतःच्या नावावर साठेखत आणि काळुराम जाधव याच्या नावावर कुलमुखत्यारपत्र लिहून घेतले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर तपास करीत आहेत.
मित्राला ज्यादा नफ्याचे आमिष दाखवून एकाने गंडवलं; खोटा चेक दिला अन्…
मित्राला ज्यादा नफ्याचे आमिष दाखवून एकाने गंडवलं
आधुनिक मशिनरीच्या व्यवयासात गुंतवणूक केल्यास आकर्षक नफ्याचे आमिष दाखवत तरुणाची पाच लाख २४ हजारांची फसवणूक करण्यात आली. एप्रिल २०२४ ते मे २०२४ या कालावधीत हा प्रकार रमानगर, गल्ली क्रमांक २ येथे घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुध्द उस्मानपुरा पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज कडुबा गायकवाड (वय २९, रा. रमानगर, गल्ली क्रमांक २) यांनी तक्रार दाखल केली. यामध्ये सुरजची ओळख २०२३ मध्ये अमोल भास्कर कांबळे (रा. वाळूज महानगर २, गुरुदक्षिणा अपार्टमेंट) याच्यासोबत झाली होती. या काळात सुरजने त्याच्या प्रिंटीग प्रेसच्या व्यवसायासाठी एसबीआय बँकेतून साडेआठ लाखांचे कर्ज घेतले होते. अमोल कांबळे सोबत चांगली मैत्री झाल्याने अमोलने सुरजला नफ्याचे आमिष दाखवले. अमोलवर विश्वास असल्याने सुरजने त्याच्या कर्जाची रक्कम ९ लाख ५८ हजार ऑनलाईन आणि रोख १ लाख १५ हजार रुपये अमोलला दिले होते. यानंतर अमोलने सुरजला व्यवसायामधून नफ्याच्या रकमेपैकी ५ लाख ४९ हजार रुपये ऑनलाईन परत केले होते.