मंत्री बावणकुळेंच्या नावाने दमदाटी
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मधून धक्कदायक घटना समोर आली आहे. एका २७ वर्षीय महिलेची ओळख करून तिला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि शरीर संबंध ठेवण्यासाठी वारंवार मारहाण आणि लैंगिक शोषण एका वकिलाने केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेचा दोन वेळा गर्भपात करण्यात आलं असून लग्नाचं विषय काढल्यानंतर पीडित महिलेला गाडीने उडवण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीडित महिलेने आरोपी वकिला विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी वकिलाचे नाव महेंद्र भगवान नैनाव ३४ वर्षीय असे आहे. महिला आपल्या पतीपासून वेगळी राहते. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान महिलेची आरोपी वकिलाशी ओळख झाली. आरोपीने संपर्क वाढवून ओळख वाढवली. महिलेला लग्नाचा आमिष देऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेवले. आजारपणातही शरीर संबंध ठेवण्यास आरोपीने तरुणीला भाग पाडलं असे गंभीर आरोप महिलेने केले आहे.
नेमकं काय घडलं?
२०१८ मध्ये महिलेचं लग्न झालं होत. तिला सहा वर्षांचा मुलगा आहे. लग्नानंतर काही वर्षांनी पतीसोबत न पटल्याने पती आणि पत्नीची कौटुंबिक न्यायालयात केस सुरू होती. या न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान आरोपी वकील महेंद्र नैनाव या वकिलाने महिलेशी मोबाईल नंबरची देवाण घेवाण केली. दोघांची मैत्री झाली. आरोपी वकिलाने महिलेला लग्नाचं आमिष दिल. आरोपीने पीडित महिलेला ८ मार्च ते १२ जून दरम्यान शहरातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. लग्नाचं आमिष दाखवून महिलेशी शरीरसंबंध ठेवले. त्याने तिला सांगितले की तुझं LLB चं शिक्षण होईपर्यंत आपण खोली भाड्यानं घेऊन राहू असे सांगितले. दोघे एकत्र राहू लागले. यादरम्यान पीडित महिला दोनवेळा गर्भवती राहिली. आरोपीने तिला गर्भपात करायला लावला. महिलेने वारंवार लग्नाचे मागणी केल्यानंतर आरोपी वकिलाने पीडितेला आजारी असतानाही शरीर संबंध ठेवण्यास भाग पडत होता. त्याने मारहाण करायला सुरुवात केली. लैंगिक शोषण केले. 3 ऑगस्ट रोजी आरोपीने पीडित महिलेला गाडीने उडवण्याची धमकी दिल्यानंतर महिलेनं पोलीस ठाणं गाठलं. त्यानंतर आरोपी वकिला विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.