ठाणे: ठाणे शहरातील एका नामांकित शाळेमध्ये एका चार वर्षाच्या मुलीसोबत शाळेत गैरकृत्य झाल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत पोलिस ठाण्यात गुन्ह्यात दाखल करण्यात आला आहे. निळ्या रंगाचा टी शर्ट घातलेल्या एका व्यक्तीने तिच्यासोबत गैरकृतयु केल्याचे पीडित मुलीने तिच्या आईला सांगितले. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. ही घटना ३० जुलै रोजी दुपारी शाळेच्या बाथरूममध्ये घडली.
पत्नी नांदायला येत नसल्याचा पतीला राग आला अन्…; पुण्यातील संतापजनक प्रकार
या घटनेप्रकणी पहिल्यांदा मुलुंड येथील नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र हे कृतयु ज्या शाळेत घडलं ती शाळा ठाण्यात असल्यामुळे तेथील वर्तकनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजची तपासणी केली होती. मात्र चौकशीत त्यांना काहीही आढळले नसल्याची पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये ही मुलगी व तिची मैत्रीण बाथरूममध्ये जातांना कॅमेऱ्यात दिसत आहे. मात्र, अन्य कुणीही त्यांच्यासोबत किंवा नंतर आतमध्ये गेल्याचे दिसत नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पालकांनी केलेल्या तक्रारीत त्यांनी आरोप केला आहे की ३० जुलै रोजी सकाळी 11:15 ते दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान निळ्या कपड्यातील एका व्यक्तीने शाळेच्या आवारात त्यांच्या मुलीसोबत गैरकृत्य केले. असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, पोलिसांनी त्यांच्या चौकशीचा भाग म्हणून शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
पोलिसांनी काय माहिती दिली
“आम्ही या प्रकरणाची चौकशी POCSO (लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण) कायद्याअंतर्गत करत आहोत. सुरुवातीच्या सीसीटीव्ही तपासात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळली नसली तरी, आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत,” असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.या प्रकरणात शाळा प्रशासन पोलिसांना सहकार्य करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत आणि परिसरातील इतर साक्षीदारांकडूनही माहिती घेतली जात आहे.
Phaltan Crime News : चिमुरडीला मामाकडून अमानुष मारहाण, फलटणमधील संतापजनक प्रकार