kidnap(फोटो सौजन्य social media)
छत्रपती संभाजीनगरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. दुसऱ्या वर्गात शिकारणाऱ्या ७ वर्षीय मुलाचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलाने आरडाओरडा केल्याने अपहरण करणाऱ्यांचाहा डाव फसला. या प्रकरणी दोन अज्ञात अफराणकर्त्यांविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ वर्षीय मुलाचे नाव दिक्षित अजय सानप असे आहे.
ही घटना न्यू एसटी कॉलनी परिसरात घडली. याठिकाणी असलेल्या एका शाळेत अक्षित दुसऱ्या वर्गात शिक्षण घेतो. शनिवारी शाळेचा पहिला दिवस होता त्यामुळे शाळेत सेलिब्रेशनचा कार्यक्रम घेण्यात आला. नेहमी शाळा दुपारी 12.30 ते सायंकाळी 5.30 असते परंतु शनिवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने आणि शाळेत सेलिब्रेशनचा कार्यक्रम घेण्यात आल्याने सर्व मुलांना 2:30 वाजता घरी जाण्याची परवानगी दिली. शाळेतील शिक्षकांनी अक्षितच्या कुटुंबियांना तो घरी येत असल्याची माहिती दिली. त्याची शाळा घराच्या जवळ असल्याने तो एकटाच पायी घरी येत होता. दुपारी 2:45 च्या सुमारास स्कूटीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने अक्षितला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाने आरडाओरडा केल्याने अपहरणकर्त्यांचा हा डाव फसला. ही बाब सीसीटीव्हीत कैद झाली आहे.या घटनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. अज्ञात २ आरोपींविरद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेत आहेत.
आधी दिली धमकी; पेट्रोल घेऊन शेतकरी शिरला आमदाराच्या घरात
बुलढाणा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात संतप्त शेतकाऱ्याने चक्क भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आमदार संजय कुटे यांचं निवासस्थान पेटवून देण्याचा प्रयत्न केलाय. अतिवृष्टीमुळे शेतीच झालेलं नुकसान भरपाई न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.