8 हजारांच्या लाचप्रकरणी महावितरणचे 'ते' दोघे अटकेत; ACB ने रंगेहात पकडलं
पुणे : ठेकेदाराकडून ६० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभगाने सापळा कारवाई करून पकडले आहे. शिरूर तालुक्यातील भांबर्डे ग्रामपंचायत परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी निर्मला कैलास भुजबळ (वय ४४) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत ठेकेदाराने लाचलुचतप प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
ठेकेदाराने २०२०-२१ मध्ये शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात सिमेंटचे गट्टू (पेव्हर ब्लॉक) बसविले होते. तसेच अंगणवाडीचे बांधकाम केले होते. या कामाचे देयक ठेकेदाराने ग्रामपंचायत अधिकारी निर्मला भुजबळ यांना दिले होते. देयक मंजुरीसाठी भुजबळ यांनी ठेकेदाराकडे ६० हजार रुपयांची लाच मागितली होती. ठेकेदाराने तक्रार दिल्यानंतर एसीबीकडे तक्रारीची पडताळणी केली. भुजबळ यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर भांबर्डे ग्रामपंचायत परिसरात सापळा लावण्यात आला.
ठेकेदाराकडून ६० हजारांची लाच स्विकारताना भुजबळ यांना पकडले. त्यांच्यावर रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक वीरनाथ माने तपास करत आहेत.