तरुणीकडून खंडणी उकळण्यासाठी कळसच गाठला; थेट अत्याचाराचा गुन्हा...
पुणे : लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन एका तरुणीने एकाकडून तब्बल ४ लाख ६४ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नयना सतीश कुंटे (रा. लाइफ निर्वाणा सिटी, धानोरी) असे गु्न्हा दाखल केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत ३१ वर्षीय तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कुंटे आणि तक्रारदार तरुणाची जानेवारी महिन्यात ओळख झाली होती. तरुण धानोरी भागात राहायला आहे. दोघांत जास्त जवळीक निर्माण झाली होती. याचाच फायदा कुंटे हिने घेण्यास सुरूवात केली. नंतर कुंटे हिने तरुणाला धमकाविण्यास सुरुवात केली. लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करते. तुला गुन्ह्यात अडकवते, अशी धमकी देऊन त्याच्याकडून वेळोवेळी चार लाख ६४ हजार रुपये उकळले. तरुण, तसेच त्याच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देखील तरुणीने दिली होती. कुंटेच्या त्रासामुळे तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुडगे तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : कांदा व्यापाऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक; ऑनलाईन पैसे घेतले अन्…
ज्येष्ठाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
मुंढवा परिसरात एका ६० वर्षीय ज्येष्ठाने शेजारी राहत असलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. याबाबत सहा वर्षाच्या मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. मुंढवा पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदारांची एक ४ वर्षाची आणि ६ वर्षाची अशा दोन्ही मुली घराबाहेर खेळत होत्या, शेजारी राहत असलेल्या आरोपी नराधमाने त्यांना चॉकलेट खायला देऊन आपल्या घरी नेले. नंतर ६ वर्षाच्या मुलीवर वेळोवेळी त्यांच्यावर अत्याचार केला. असे दोन तीन वेळा झाल्याने सहा वर्षाच्या मुलीने झालेला प्रकार आईला सांगितला. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेऊन मंगळवारी संध्याकाळी तक्रार दिली आहे. तक्रार मिळताच पोलीस उपायुक्त आर राजा, वरिष्ठ निरीक्षक नीलकंठ जगताप अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मुंढवा पोलिसांनी तात्काळ नराधमावर बाल लैंगिक अत्याचारचा गुन्हा दाखल करून अटक केली असून, पुढील तपास करीत आहे.
विद्यार्थीनीवर सामूहिक लैगिंक अत्याचार
अल्पवयीन मुलींना पळवून नेणे, त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर विनयभंग व अत्याचार करणे अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे मुली असुरक्षित वातावरणाच्या सावटात असल्याचे जिल्ह्यात चित्र निर्माण झाले आहे. कायद्याचा धाक नसल्यामुळे सातत्याने घडत असलेल्या अशा घटनांमुळे अल्पवयीन मुली व त्यांच्या पालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. काही महिन्यापूर्वी बदलापूर शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता.त्यातच आता छत्तीसगडमध्ये आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. यामध्ये धक्कादायर म्हणजे ज्या शिक्षकांना आई वडिलांनंतर श्रेष्ठ स्थान आणि गुरु पूजनीय मानतो, त्यांनीच दानवी कृत्य केल्याचं समोर आलं आहे. छत्तीसगडमधील या आदिवासी मुलीवर शाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षक आणि एक वनरक्षकांनी सामूहिक अत्याचार केला. छत्तीसगडमधील मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर जिल्ह्यात ही घटना घडली. या अल्पवयीन मुलीचे वय 17 वर्षे असून ती घरी राहून अभ्यास करायची.