Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भरधाव कारने एकाच कुटुंबातील सदस्यांना चिरडलं, दोघांचा मृत्यू तर पाच जण जखमी….

उत्तरप्रदेश येथे एका भरधाव वेगात असलेल्या कारने एकाच कुटुंबातील ७ जणांना चिरडले. यात दोघांचा मृत्य झाला असून चार वर्षाच्या मुलासह पाच जण जखमी झाले. जखमींवर उपचार सुरु आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 26, 2025 | 11:07 AM
पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावर अपघात; मद्यधुंद कारचालकाने पाच जणांना केले जखमी

पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावर अपघात; मद्यधुंद कारचालकाने पाच जणांना केले जखमी

Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये उशिरा रात्री भीषण अपघात झाल्याची घटना घडली. भरधाव गाडीने एकाच कुटुंबातील सात जणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हे कुटुंब रस्त्याच्या कडेला झोपलेले होते. या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पाच जणांवर उपचार सुरु आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास गोरखपूरमधील बालापार-टिकरिया रोडवरील रघुनाथपूर भगवानपूर गावाजवळ घडली.

खाजगी बसचा मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 8 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, 3 गंभीर

एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एकाच कुटुंबातील सात सदस्यांना चिरडलं. या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहे. सर्व जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे, उपचार सुरू असताना आई आणि मुलीचा मृत्यू झाला. चार वर्षांच्या मुलासह पाच जणांवर उद्याप उपचार सुरू आहेत. अपघातानंतर नागरिकांनी भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या एका तरुणाला पकडलं.

पोलिसांनी काय दिली माहिती?
रघुनाथपूर भगवानपूर गावात बालापार-टिकरिया रोडच्या बाजूला सईदा खातून यांचे घर आहे. उष्णतेमुळे कुटुंबातील सर्व सदस्य घराबाहेर रस्त्याच्या कडेला खाटांवर झोपले होते. रात्री 10.30 वाजता एक वेगवान कार मंगळस्थानहून बाळापारकडे जात असल्याचे सांगण्यात येत आहे. लग्नाची पार्टी गाडीत होत होती. गाडी इतक्या वेगाने जात होती की ती नियंत्रणाबाहेर गेली आणि डाव्या बाजूला रस्त्यावरून खाली घसरली. यादरम्यान, घरासमोर रस्त्याच्या कडेला असलेल्या खाटेवर झोपलेल्या कुटुंबातील सदस्यांना कारने चिरडलं. कारने चिरडल्याने सईदा खातून (30) आणि त्यांची मुलगी सुफिया (16) यांच्यासह कुटुंबातील सदस्य बद्रे आलम (17), राबिया (32), मरियम (50), जुबैर (14) आणि निहाल (04) जखमी झाले. त्या सर्वांना बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले, मात्र, उपचारांदरम्यान सईदा खातून आणि मुलगी सुफिया यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर संतप्त लोकांनी गाडी ताब्यात घेतली. गाडीतील चार जण पळून जाऊ लागले. पण, लोकांनी त्यापैकी एकाला पकडले, आणि त्याला मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गाडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. लोकांचा रोष पाहून गुलरीहा आणि चिलुआताल पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लोकांना समजावून गाडी ताब्यात घेतली. एसपी सिटी अभिनव त्यागी म्हणाले की, अपघातात दोघांचा मृत्यू झाला. जखमींवर बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. अपघात कसा झाला याचा तपास सुरू आहे. एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.

नियमबाह्य फी म्हणून लाच मागणं भोवलं; मुख्याध्यापिकेसह शिक्षिका एसीबीच्या जाळ्यात

Web Title: A high speed collision crushed members of the same family leaving two dead and five injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 10:47 AM

Topics:  

  • Accident
  • Uttar Pradesh
  • Uttar Pradesh Accident

संबंधित बातम्या

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
1

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता
2

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral
3

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश
4

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.