Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भांडुपमध्ये भीषण अपघात; भरधाव ‘बेस्ट’ने अनेकांना चिरडले, चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी

भांडुप (पश्चिम) येथील स्टेशन रोडवर एक मोठा बस अपघात झाला. बेस्टच्या बसने अनेक लोकांना चिरडल्याचे समोर आले आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाल्याची माहिती दिली जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 30, 2025 | 07:24 AM
भांडुपमध्ये भीषण अपघात; भरधाव 'बेस्ट'ने अनेकांना चिरडले, चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी

भांडुपमध्ये भीषण अपघात; भरधाव 'बेस्ट'ने अनेकांना चिरडले, चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी

Follow Us
Follow Us:

मुंबई : भांडुप (पश्चिम) येथील स्टेशन रोडवर एक मोठा बस अपघात झाला. बेस्टच्या बसने अनेक लोकांना चिरडल्याचे समोर आले आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाल्याची माहिती दिली जात आहे. हा अपघात सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास झाला. यातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघातातील जखमींवर उपचार सुरू असून, याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलिस उपायुक्त (डीसीपी) घटनास्थळी उपस्थित आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, भांडुपमधील स्टेशन रोडवर रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबई पोलिस झोन ७ चे डीसीपी हेमराज सिंह राजपूत यांनी सांगितले की, अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले आहेत. आरोपी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

हेदेखील वाचा : Karnataka Bus Accident : कर्नाटकमध्ये ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात; आगीत होरपळून 10 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

या अपघाताची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल (एमएफबी), स्थानिक पोलिस, बेस्ट बस कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका सेवा यांसह अनेक आपत्कालीन यंत्रणांना तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले. सुरुवातीच्या अहवालात असे दिसून आले आहे की या घटनेत १० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींची नेमकी संख्या आणि अपघाताविषयी अधिक माहिती घेतली जात आहे.

कुर्ल्यातील ‘त्या’ आठवणी पुन्हा ताज्या

गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी अशीच एक घटना घडली. यामध्ये इलेक्ट्रिक बेस्ट बस अनेक पादचाऱ्यांना आणि अंदाजे २२ वाहनांना धडकली. कुर्ला येथील एसजी बर्वे मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरकडे जाणाऱ्या सिमेंटच्या गेटला धडकली. ही बस थांबण्यापूर्वी सुमारे २०० मीटर धावत राहिली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि ४२ जण जखमी झाले.

काही दिवसांपूर्वीच कर्नाटकातही बस अपघात

दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील गोरलाथू गावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली. गुरुवारी (दि.25) सकाळी राष्ट्रीय महामार्ग ४८ वर एका खाजगी बसला ट्रकने धडक दिली. ट्रॅव्हल बसच्या झालेल्या अपघातानंतर बसला आग लागल्याने १० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. खाजगी स्लीपर कोच बस गोकर्णहून शिवमोगा येथे जात होती. धडकेनंतर बसने पेट घेतला, ज्यामध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला, आत्तापर्यंत यामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला.

Web Title: A horrific accident occurred in bhandup four people died

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 07:15 AM

Topics:  

  • Accident News
  • Bus Accident
  • Mumbai News

संबंधित बातम्या

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी
1

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी

माळशेज घाटात एसटी बस आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात; जखमींचा आकाडाही आला समोर
2

माळशेज घाटात एसटी बस आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात; जखमींचा आकाडाही आला समोर

Mumbai News: ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; ५३ हजार शिबिरांचे आयोजन
3

Mumbai News: ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; ५३ हजार शिबिरांचे आयोजन

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
4

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.