शिक्रापूरमध्ये घडली धक्कादायक घटना
शिरुर येथील महिलेची गुलाम शेख याच्या सोबत ओळख झाल्यानंतर गुलाम याने महिलेशी ओळख वाढवून महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यांनंतर महिलेला वेळोवेळी शिक्रापूर, टिंगरेनगर येथील हॉटेलवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यांनतर महिलेने लग्नाबाबत चर्चा केली असता गुलाम याने महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पिडीत महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुलाम हुसेन शेख रा. भरत ढाबा जवळ धानोरी पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहे.