Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अल्पवयीन’ गुन्हेगारीचा नवा भेदक चेहरा! उमद्या वयात शिक्षणाऐवजी शस्त्र; समाजमाध्यमांवरून भाईगिरीचं प्रदर्शन

टोळ्यांच्या सूडात शहरातील रस्ते रंक्तरंजित होत असताना पुण्याच्या गुन्हेगारीचा नवा चेहरा बनलेल्या 'अल्पवयीन' मुलांकडून देखील या रक्तरंजित खेळात भर घातली जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 06, 2025 | 02:54 PM
'अल्पवयीन' गुन्हेगारीचा नवा भेदक चेहरा! उमद्या वयात शिक्षणाऐवजी शस्त्र; समाजमाध्यमांवरून भाईगिरीचं प्रदर्शन

'अल्पवयीन' गुन्हेगारीचा नवा भेदक चेहरा! उमद्या वयात शिक्षणाऐवजी शस्त्र; समाजमाध्यमांवरून भाईगिरीचं प्रदर्शन

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘अल्पवयीन’ गुन्हेगारीचा नवा भेदक चेहरा!
  • उमद्या वयात शिक्षणाऐवजी शस्त्र
  • समाजमाध्यमांवरून भाईगिरीचं प्रदर्शन

पुणे/अक्षय फाटक  : टोळ्यांच्या सूडात शहरातील रस्ते रंक्तरंजित होत असताना पुण्याच्या गुन्हेगारीचा नवा चेहरा बनलेल्या ‘अल्पवयीन’ मुलांकडून देखील या रक्तरंजित खेळात भर घातली जात असून, जुन्या वादविवादातून हे रस्त्यांवर रक्तांचा सडा पाडू लागले आहेत. गेल्या काही वर्षांमधील गुन्ह्यांमधील अल्पवयीन मुलांची आकडेवारी पाहिल्यानंतर पुण्यात अल्पवयीन गुन्हेगारीचा स्फोट झाला की काय अशी स्थिती दिसत आहे. गेल्या पाच वर्षात १४०० गुन्ह्यांत जवळपास २२४४ मुलांवर गुन्हे नोंद झाले आहेत. त्यांच्या गुन्हेगारीमुळे पोलिस देखील हतबल झाले आहेत.

कोंढव्यातील खून आणि दुसऱ्याच दिवशी घडलेल्या बाजीराव रस्त्यावरील खूनानंतर अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. ‘विद्येचं माहेरघर’ म्हणणाऱ्या पुण्यात मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीचा चेहरा बदलताना दिसत आहे. शिक्षणाचं वय असलेली अनेक मुलं गुंडगिरी अन् भाईगिरीकडे वळली आहेत. त्यांच्या स्वत:च्याही टोळ्या झाल्या आहेत. तर, अनेकजन हे टोळक्यांमध्ये भरती होऊन गुन्हेगारीकडे वळले आहेत. या मुलांना एखाद्याला मारणं म्हणजे, स्टेट्स निर्माण झाल आहे. हे मारमारीनंतर रिल्स बनवून त्याच उद्दात्तीकरण देखील करत असल्याचे दिसत आहे. एकमेकांना पाहून घेण्याची व ताकद दाखविण्याची भाषा खुलेआम सुरू असते. पिस्तूल दाखविणे, हातात हत्यार घेऊन व्हिडीओ काढणे, त्यावर भाईगिरीची टॅग लावणे या मुलांमध्ये क्रेझ निर्माण झाली आहे. परिसरात नाव कमावण्यासाठी, ‘भाई’ बनण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी कोयते घेऊन फिरणाऱ्या या अल्पवयीनामुळे मात्र पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने निर्माण होत असल्याचे दिसत आहे.

गुन्हेगारीचा नवा पॅटर्न

  • वाहनांची तोडफोड, दहशत माजवणे
  • सोशल मीडियावर गुन्ह्यांचे व्हिडिओ अपलोड करून प्रसिद्धी मिळवणे
  • स्थानिक टोळ्या तयार करून वर्चस्व निर्माण करणे
  • किरकोळ वादातून थेट खून किंवा हल्ल्यांपर्यंत पोहोचणे

आकडेवारी सांगते काय?

गेल्या पाच वर्षांतील पोलिस आकडेवारी

वर्ष गुन्ह्यांची संख्या आरोपींची संख्या
२०२१ ३३६ ५१९
२०२२ ३४२  ५४४
२०२३  २९३ ४३५
२०२४  ३०३  ५१४
२०२५ (ऑक्टोबरपर्यंत) १४९ २३२

कायदा आणि कारवाई

अल्पवयीन (१८ वर्षांखालील) मुलांवर बालगुन्हेगार न्याय कायदा २०१५ अंतर्गत कारवाई होते. शिक्षेची व दंडाची तरतूद असली तरी या सौम्य कायद्याचा काही ठिकाणी गैरवापर केला जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मे २०२४ मध्ये पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अल्पवयीन टोळ्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र वाढत्या घटनांनी हा उपायही पुरेसा ठरत नाहीय.

सोशल मीडियावर फॉलोअर्स

कोंढव्यात वनराज आंदेकर याच्या खूनाचा बदला म्हणून घडलेल्या सागर काळे खून प्रकरणातील एका अल्पवयीन मुलाची माहिती पोलिसांनी काढली असता या मुलाचे सोशल मिडीयावर प्रचंड फॉलोअर्स असल्याचे दिसून आले आहे. लाखांत त्याचे फॉलोअर्स असल्याचे सांगण्यात आले. या सोशल मिडीयाच्या माध्यमातूनच हे मुल भाईगिरीच्या मोहात पडत असल्याचेही एक निरीक्षण आहे.

Web Title: A large number of minors are turning to crime in pune city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

मुलीचा इन्स्टाग्राम आयडी न दिल्याचा आला राग; अल्पवयीन मुलावर चाकूने वार केला अन्…
1

मुलीचा इन्स्टाग्राम आयडी न दिल्याचा आला राग; अल्पवयीन मुलावर चाकूने वार केला अन्…

सिगारेट न दिल्याचा राग अनावर; हातगाडीवर काम करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण
2

सिगारेट न दिल्याचा राग अनावर; हातगाडीवर काम करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण

Bajirao Road Murder : बाजीराव रस्त्यावरील खूनप्रकरणी मोठी अपडेट; सीसीटीव्हीही कॅमेराबाबत धक्कादायक माहिती समोर
3

Bajirao Road Murder : बाजीराव रस्त्यावरील खूनप्रकरणी मोठी अपडेट; सीसीटीव्हीही कॅमेराबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Crime: संसार थाटला, अनेकांच्या घरी काम केलं… पण व्हिसाची मुदत संपली; दहशतवाद विरोधी पथकाने घेतलं ताब्यात
4

Pune Crime: संसार थाटला, अनेकांच्या घरी काम केलं… पण व्हिसाची मुदत संपली; दहशतवाद विरोधी पथकाने घेतलं ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.