Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हडपसरमधील ‘त्या’ चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ व्यक्त

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हडपसरमधील वैभव टॉकीजजवळ भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 18, 2025 | 04:03 PM
रिक्षातून पडल्याने महिलेचा मृत्यू; पोटची तिन्ही मुलं झाली पोरकी

रिक्षातून पडल्याने महिलेचा मृत्यू; पोटची तिन्ही मुलं झाली पोरकी

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हडपसरमधील वैभव टॉकीजजवळ भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. मुलीच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. यात मृत मुलीची आई जखमी झाली आहे.

निशा प्रल्हादकुमार शर्मा (वय ९) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी संध्याकुमारी शर्मा (वय ३०, रा. फुरसुंगी) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून ट्रकचालकावर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात रात्री साडेनऊच्या सुमारास झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रकचा चालक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव चालला होता. तर तक्रारदार त्यांच्या मुलीसह दुचाकीवरून गाडीतळाच्या दिशेला चालल्या होत्या. त्यावेळी ट्रक चालकाने त्यांना धडक दिली. यात त्या दोघी रस्त्यावर पडल्या. दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, तेथे मुलीचा मृत्यू झाला.

दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक तेथे न थांबता पसार झाला. त्याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, हडपसर गाडीतळ परिसरात शाळांचे प्रमाण अधिक आहे. मुलांना शाळेत सोडणे आणि शाळेतून घेऊन जाणे, यासाठी अनेक पालक मोपेड गाड्यांचा वापर करतात. त्यात मुलांना मोपेडला पुढे उभे करण्याचे प्रमाण अधिक आहे. पालकांनी मुलांना ने-आण करताना, त्यांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन सहायक निरीक्षक हसीना शिकलगार यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलीस आयुक्त थेट उतरले रस्त्यावर; नागरिकांना दिलं मोठं आश्वासन

दीर- भावजयचा मृत्यू

पुण्यातील जेल रोडवरील एका रुग्णालयासमोर गेल्या काही दिवसाखाली भरधाव कारने दिलेल्या धडकेत दीर भावजयीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोहगाव परिसरातील जेल रस्त्यावरील संजय पार्क येथे हा अपघात गुरूवारी सकाळी झाला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद गोवेकर (वय ५२), रेश्मा गोवेकर (वय ४७) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक अचलकुमार (वय ४३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रसाद गोवेकर (वय ५४, रा. शिव पार्वती मंगल कार्यालयाजवळ, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

महिला पोलिसाला कारने उडवले

राज्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईनिमित्त नाकाबंदी करून कारवाई करत असताना एका भरधाव आलिशान कारने कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविल्याची धक्कादायक घटना घडली. यात महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आलिशान कारमध्ये चौघेजन असल्याचे माहिती समोर आली. महिला अंमलदार दीपमाला राजू नायर (वय ३५) असे गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A little girl from hadapsar has unfortunately died in an accident nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 03:59 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Accident
  • pune news

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
4

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.