Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील ‘या’ बड्या हुक्का पार्लरवर छापा; पोलिसांची मोठी कारवाई

कोरेगांव पार्कातील हुक्का पार्लर अन् बेकायदा दारू विक्रीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. लेन नं. ७ मधील पॉवर प्लाजा बिल्डिंगमधील हॉटेल पाल्मोकोवर ही कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 22, 2025 | 12:09 PM
पुण्यातील 'या' बड्या हुक्का पार्लरवर छापा; पोलिसांची मोठी कारवाई

पुण्यातील 'या' बड्या हुक्का पार्लरवर छापा; पोलिसांची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

पुणे : कोरेगांव पार्कातील नागरिकांशी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी ऐकूण कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कोरेगांव पार्कातील हुक्का पार्लर अन् बेकायदा दारू विक्रीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. लेन नं. ७ मधील पॉवर प्लाजा बिल्डिंगमधील हॉटेल पाल्मोकोवर ही कारवाई केली आहे.

याप्रकरणी शिवा वासुदेव सरकार (वय ३२, रा. वडगाव शेरी), शाहीद निशार अहमद हुसेन (वय २१, रा. कोरेगाव पार्क) आणि नबिल मकसुद पिरजादे (वय ३०, रा. वारजे माळवाडी), इम्रान मोहम्मद गौस रेहाली (वय ३३, रा. वडगाव शेरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार प्रविण सुधीर पडवह यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई हॉटेल पाल्मोका येथे रविवारी सायंकाळी पावणे आठ वाजता करण्यात आली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी कोरेगाव पार्क येथील लेन नं ५, ६, ७ मध्ये पायी पेट्रोलिंग करत नागरिकांशी संवाद साधला. अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांना या अडचणी सोडविण्यासोबतच कारवाईचे देखील आश्वासन दिले. तेव्हा कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे पथक लेन नंबर ७ मध्ये पेट्रोलिंग करताना हॉटेल पाल्मोको मध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमधील टेबलवर हुक्का पॉट, तंबाखुजन्य अल फकेर व रॉयल स्मोकीन नावाचे हुक्का फ्लेवर असा २२ हजार ९६ रुपयांचा माल ग्राहकांना धुम्रपानासाठी अवैधरित्या विक्रीकरता ठेवलेला दिसून आला. त्याचप्रमाणे दारु विक्रीची कोणताही परवाना नसताना हॉटेलचे किचन रुममध्ये १३ हजार ५७५ रुपयांच्या दारुच्या बाटल्या आढळून आल्या. पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे अधिक तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; चोरी करुन पळून गेलेल्या चोरट्याला पकडले

बावधनमध्ये हुक्का पार्लरवर कारवाई

दरम्यान गेल्या काही दिवसाखाली बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हाळुंगे येथे बॉम्बे बिस्ट्रो रेस्ट्रो बार मध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर बावधन पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये 6,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 12) रात्री करण्यात आली. सौम्यरंजन शिशिरकुमार बेहरा (वय 21, रा. वाकड), राहुल श्रीकांत कुलकर्णी (वय 37, रा. भुगाव, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: A major police action has been taken by raiding a hookah parlor in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2025 | 12:08 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त
1

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
2

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
3

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
4

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.