साडेचार वर्षाच्या चिमुरडीवर युवकाकडून अत्याचार
कल्याण : विनयभंग, अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. यातच कल्याणजवळील मोहने गाळेगाव परिसरात एका 15 वर्षीय गतिमंद अल्पवयीन मुलीचा एका इसमाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत विनयभंग करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कल्याणजवळील मोहने गाळेगाव परिसरात सदर गतिमंद मुलगी आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. ही मुलगी बुधवारी आपल्या घराच्या परिसरातील अंगणात खेळत होती. याच वेळी सुनील पवार या नराधमाची नजर तिच्यावर पडली. सुनील पवार याने तिला घरात बोलावून घेतले. सदर मुलगी घरात आल्यानंतर त्याने घराचे दार बंद करत तिच्याशी अश्लील चाळे केले. पण, कुटुंबियांना याचा संशय आला असता मुलीला सुरक्षितरित्या बाहेर काढले. तसेच तिची विचारपूस केली असता घाबरलेल्या मुलीने घडलेला प्रकार सांगितला.
दरम्यान, याप्रकरणी कुटुंबीयांनी तत्काळ टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी सुनील पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे
बंद घरात आढळली मुलगी
बराच वेळ झाल्यानंतर मुलगी दिसत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. शोध घेत असताना सुनीलचे घर आतून बंद असल्याचे निदर्शनास आले. यामुळे कुटुंबियांना सुनील याच्यावर संशय आला. त्यांनी सुनीलचा दरवाजा ठोठावला. मात्र, दरवाजा बंद होता. अखेर या दरवाजाचा टाळा तोडून कुटुंबीय घरात गेले असताना घरात मुलगी आढळून आली.
विधवा महिलेचा विनयभंग
दुसऱ्या एका घटनेत, विधवा महिलेची दोन्ही मुले कामानिमित्त बाहेर गेली असल्याने ती घरी एकटीच झोपली होती. याच संधीचा फायदा घेऊन एका नराधमाने मध्यरात्रीच्या सुमारास तिचा विनयभंग केला. ही घटना बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक अग्रवाल यांच्या आदेशानुसार, आरोपी प्रशांत हरिश्चंद्र सोनवने (वय 42) याला तात्काळ अटक करून 24 तासांत न्यायालयासमोर हजर केले.