खळबळजनक ! महिलेची हत्या करून मुलाने घेतला आईला चापट मारल्याचा बदला
गाझियाबाद : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील टिला मोड परिसरातून एक हत्येप्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी शिरच्छेद केलेला मृतदेह आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी तपासानंतर पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.
हेदेखील वाचा : पतिसमोरच सासरा करायचा सुनेवर लैंगिक अत्याचार; पिंपरी-चिंचवडमधील संतापजनक प्रकार
या हत्येप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, मानवी कवटीवर तंत्र-मंत्राद्वारे कोट्यवधी रुपये मिळवण्यासाठी तरुणाची हत्या करण्यात आली. जूनमध्ये घडलेल्या या घटनेत शनिवारी रात्री दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांच्या माहितीवरून तरुणाच्या कवटीसोबतच एका प्राण्याची कवटीही जप्त करण्यात आली. याप्रकरणी आतापर्यंत दोन तांत्रिकांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी यूट्यूबवरून काळी जादू आणि तंत्र मंत्र शिकल्याचे तपासात उघड झाले आहे.
तंत्र-मंत्र शिकला अन्…
पोलिसांच्या चौकशीत विकास उर्फ परमात्माने सांगितले की, तो ई-रिक्षा चालवायचा. दिल्लीतील नंद नगरी येथे राहणाऱ्या नरेंद्रला तो दररोज भेटायचा. नरेंद्र दिल्लीच्या जीटीबी हॉस्पिटलमध्ये लिफ्ट चालवायचा. आरोपींनी यूट्यूबवरून काळी जादू आणि तंत्र-मंत्र शिकून घेतला. यानंतर नरेंद्रने त्याला भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दिले. मात्र, त्यासाठी त्याला मानवी कवटीची व्यवस्था करण्यास सांगितले.
कवटीने तंत्रविद्या
पवन कुमार आणि त्याचा भाऊ पंकज हे त्या कवटीने तंत्रविद्या करतील. त्यातून सुमारे 60 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. विकासने हा प्रकार त्याच्यासोबत खोलीत राहणारे धनंजय आणि विकास प्रजापती यांना सांगितला व मानवी कवटीसाठी कोणाचा तरी शोध घेण्यास सांगितले. त्याने दिल्लीतील हमदर्द स्क्वेअर येथील मोतिहारी बिहार येथील रहिवासी राजू कुमार याला जाळ्यात ओढले.
डोळाही काढला
राजूचा मृतदेह लपवण्यासाठी विकास उर्फ मोटा याच्या ऑटोमध्ये ठेवून पंचशील कॉलनी, टिला मोड येथील जंगलात नेण्यात आला. तेथे राजूचे शिर कापून खोलीत आणले. चाकूने कवटी सोलून डोळा काढल्यानंतर चौघांनी कवटी तांत्रिक पवन आणि पंकज यांना दिली.
हेदेखील वाचा : पोटच्या मुलाने आई-वडिलांसह बहिणीची गळा चिरुन केली हत्या, संपत्तीसाठी मुलाचं धक्कादायक कृत्य