Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वेतच महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न; विरोध करताच धावत्या रेल्वेखाली दिलं ढकलून

एक मालगाडी तेथून जात असताना आरोपीने तिला या गाडीच्या खाली ढकलले. त्यानंतर तिची हत्या करून तो रेल्वे ट्रॅकमधून चालत जात होता. त्यावेळी त्याला दिवा रेल्वे स्टेशन येथील ड्युटीवरील पोलिसांनी ताब्यात घेतले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 20, 2025 | 11:13 AM
रेल्वेखाली ढकलून महिलेची हत्या

रेल्वेखाली ढकलून महिलेची हत्या

Follow Us
Follow Us:

मुंबई : मुंबईतील दिवा रेल्वे स्थानकादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली. रेल्वेतील एका अनोळखी महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. मात्र, ती महिला प्रतिसाद देत नाही म्हणून या माथेफिरूने तिला थेट रेल्वेखाली ढकलून तिची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजन शिवनारायण सिंग याला अटक केली आहे.

आरोपी राजन आणि ती अनोळखी महिला यांच्यात बराच वेळ या ठिकाणी वादविवाद सुरू होता, अशी माहिती येथील सफाई कर्मचाऱ्यांनी दिली. १८ जुलै रोजी पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान या गुन्ह्यातील फिर्यादी तुळसीदास हेमा कामडी (विहीगाव, कसारा), हे दिवा रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक ७-८ वर सफाईचे काम करत होते. त्यावेळी फलाट क्रमांक ५-६ वरुन आरडाओरडा करण्याचा आवाज आला. त्यामुळे यातील फिर्यादी कर्मचारी आणि त्याच्यासह असलेल्या दुसऱ्या एक सफाई कामगाराने हा प्रकार पाहिला.

हेदेखील वाचा : धक्कादायक ! सांगलीतील कवठेमहांकाळ येथे एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न; सासू-सूनेचा मृत्यू तर…

यावेळी यातील आरोपी राजन शिवनारायण सिंग (दिवा) याचा एका महिलेसोबत वादविवाद चालू होता. यातील अटकेतील आरोपी हा त्या महिलेच्या सोबत कल्याण बाजूकडे चालत जाऊन तिचा पाठलाग करुन जवळीक करत होता. त्यावरुन त्यांच्यामध्ये वाद-विवाद चालू होता. त्यानंतर आरोपीने या महिलेला दोन्ही हातांनी गळ्याभोवती समोरुन पकडले होते. त्यामुळे ही महिला त्या व्यक्तीच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रतिकार करत होती.

मालगाडी आली अन्…

त्यानंतर एक मालगाडी तेथून जात असताना आरोपीने तिला या गाडीच्या खाली ढकलले. त्यानंतर तिची हत्या करून तो रेल्वे ट्रॅकमधून चालत जात होता. त्यावेळी त्याला दिवा रेल्वे स्टेशन येथील ड्युटीवरील पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीला आता न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यात सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. नांगोळे येथील एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सासू आणि सुनेचा मृत्यू झाला तर वडील आणि मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने सांगलीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: A man murder woman incident in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 11:13 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
2

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
3

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
4

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.