बाबा सिद्दीकींच्या खात्यातील रक्कम चोरण्याचा मोठा डाव उधळला; मोबाईल नंबर अॅक्टिव्हेट करून बँक खातं...
मुंबई : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून गेल्या वर्षी हत्या करण्यात आली. पण त्यानंतरही तपासातून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत. सिद्दीकींच्या सिम कार्डचा वापर करून बँक खाते रिकामे करण्याचा कट उघडकीस आला आहे. या धक्कादायक घटनेत पोलिसांनी दिल्लीतील एका व्यक्तीला अटक केली आहे. या अशाप्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणातील आरोपी हा माजी बँक कर्मचारी आहे. त्याने बाबा सिद्दीकीच्या सर्व बँक खात्यांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सिद्दीकींचा मोबाईल नंबर ई-वॉलेटशी जोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी त्याला दिल्लीत अटक केली. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांची गेल्या वर्षी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सिद्दीकी कुटुंबाने त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा नंबर बंद केला नाही. सदर नंबर बँक खात्यांशी आणि त्यांच्या व्यवसायाशी जोडलेला होता. त्यामुळे तो नंबर अद्यापही सुरुच होता. मात्र, आता तो नंबर पुन्हा अॅक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी एकाला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली.
अटक केलेल्या व्यक्तीने ई-मेलद्वारे सेलफोन कंपनीला बनावट कागदपत्रे सादर केली होती. ज्यामध्ये सिद्दीकीच्या कुटुंबाला दिवंगत आमदाराचा नंबर द्यायचा होता, असा खोटा दावा केला होता. आरोपींनी ते नवीन नावाने हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. आरोपीला बँक खात्यांची माहिती मिळावी म्हणून त्याने असे केले. बाबा सिद्दीकीची मुलगी डॉ. अर्शिया सिद्दीकीने दाखल केलेल्या फौजदारी खटल्यात, त्यांनी आरोप केला आहे.
यामध्ये त्यांनी फसवणूक करणाऱ्याने तिच्या आईची सही आणि तिच्या फोटो ओळखपत्रांची बनावट कागदपत्रे तयार केली. या आरोपीला दिल्लीतील बुरारी भागातून अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध आधीच अनेक सायबर गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले आहे.
कंपनीची सतर्कता आली कामी
फसवणूक करणाऱ्याने गोपनीय कागदपत्रे कशी मिळवली आणि माझ्या आईची बनावट सही कशी केली हे धक्कादायक आहे. नेटवर्क प्रोव्हायडरने सिद्दीकीच्या पत्त्यावर एक मेल पाठवला जो त्यांच्याकडे नोंदणीकृत होता. हे सिद्दीकीच्या मुलीला कळले आणि तिने सावध केले. ज्यामुळे विनंती नाकारण्यात आली. अशाप्रकारे आरोपीचा डाव उधळला गेला.