
नाडोली येथे चार घराला आग लागून संसार उपयोगी वस्तू जळाल्या
मल्हारपेठ : पाटण तालुक्यातील मल्हारपेठ विभागातील नाडोली येथील काही घरांना अचानक आग लागली. या लागलेल्या आगीत चार घरे जळून खाक झाली असून, या आगीत सर्व संसारोपयोगी साहित्य, धान्य, रोख रक्कम जळून आगीच्या भक्षस्थानी पडली. अनेक वस्तू या आगीत जळून खाक झाल्या. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठी वित्तहानी झाली आहे. या आगीत एकूण ६ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
मल्हारपेठचे मंडलाधिकारी यांनी या आगीचा पंचनामा केला. नाडोलीत लागलेल्या आगीत चार घरे जळून खाक झाली आहे. या आगीचे कारण समजू शकले नाही. याबाबत मिळालेली माहिती अशी, नाडोली येथील चार घरांना अचानक आग लागली. त्यावेळी चारही घरातील माणसे कामानिमित्त शेतात गेली होती. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, वित्तहानी मोठी झाली आहे. घरांना लागलेली आग दिसताच ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही.
हेदेखील वाचा : वेड्यांचा बाजार! पायाला आग लावून दाखवत मारत होता हुशारी, तितक्यातच हवेची झुळूक आली अन् संपूर्ण शरीर जळू लागलं; Video Viral
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांमुळे आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, तोपर्यंत चारही घरातील कौटुंबिक साहित्य व धान्य जळून खाक झाले होते. या आगीत दत्तात्रय खाशाबा मंगे यांचे १ लाख १७ हजार, अरविंद किसन मंगे यांचे १ लाख १० हजार, शंकर रामचंद्र मंगे यांचे १ लाख ८० हजार व दिनकर लक्ष्मण मंगे २ लाख ४७ हजार असे एकूण ६ लाख ५४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
आगीत मोठी वित्तहानी
या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठी वित्तहानी झाली आहे. या आगीमुळे चार कुटुंबे उघड्यावर पडली असून, त्यांना मदतीची गरज असल्याचे समोर आले आहे. या आगीचा पंचनामा मल्हारपेठचे मंडलाधिकारी सर्फराज ढालाईत यांनी केला असून आगीचे कारण समजले नाही.
हेदेखील वाचा : Surat Fire Incident : सुरतच्या राज टेक्सटाईल मार्केटमध्ये भीषण आग, आठव्या मजल्यापर्यंतच्या अनेक दुकानं जळून खाक