Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : DCM सुनेत्रा अजित पवार प्रीतीसंगमावर दाखल; स्व. यशवंतराव चव्हाण यांना केले अभिवादन

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच सातारा दौऱ्यावर गेल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी प्रीतीसंगमावर भेट देत स्वर्गीय नेते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 02, 2026 | 12:39 PM
Sunetra Pawar Satara visits paying homage Yashwantrao Chavan by at Priti Sangam in Karad

Sunetra Pawar Satara visits paying homage Yashwantrao Chavan by at Priti Sangam in Karad

Follow Us
Close
Follow Us:
  • सुनेत्रा पवार त्यांच्या पहिल्या शासकीय दौऱ्यावर
  • सुनेत्रा पवार साताऱ्यामध्ये दाखल
  • कराड येथील प्रीतीसंगमावर केले अभिवादन
Sunetra Pawar in Satara : सातारा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलाच दौरा केला आहे. सुनेत्रा पवार या साताऱ्याला (Satara News) पहिल्या शासकीय दौऱ्यावर गेल्या आहेत. आज (दि.02) कराड येथील प्रीतीसंगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला शासकीय दौरा; साताऱ्यामध्ये घेणार जाधव कुटुंबाची भेट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कराड येथे येऊन स्वर्गीय नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचे नातेही अत्यंत जिव्हाळ्याचे होते. ते वारंवार कराड येथे येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन करत होते. त्यांची आठवण यावेळी उपस्थितांना झाली.

हे देखील वाचा : Union Budget 2026 : संसदेचे वातावरण तापणार! अर्थसंकल्पावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार

कराड येथे येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण त्यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या फलटणला जाणार आहेत. फलटण तालुक्यातील तरडगाव येथे जात अजित पवारांचे सुरक्षारक्षक स्वर्गीय विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार आहेत. त्यानंतर त्या बारामतीकडे रवाना होतील. शरद पवार हे कालच मुंबईत आले. रोहित पवार देखील मुंबईत असल्याची माहिती मिळत आहे.

अजित पवार यांचे अपघाती निधन
दिवंगत नेते अजित पवार यांचे 28 फेब्रुवारी रोजी बुधवारी विमान अपघात झाला. . लँडिंगदरम्यान विमान (Learjet 45) धावपट्टीजवळ कोसळले. यामुळे विमानामध्ये तीन स्फोट झाले. विमानाला लागलेल्या आगीमध्ये सर्व प्रवासी आणि विमान जळून खाक झाले. या विमानाचा अपघात इतका भीषण होता की यामध्ये उपमुख्यमंत्र्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, पायलट-इन-कमांड कॅप्टन सुमित कपूर आणि सेकंड-इन-कमांड कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता.  गुरुवारी बारामतीतील काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Sunetra pawar satara visits paying homage yashwantrao chavan by at priti sangam in karad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • Karad news
  • Satara News
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Satara News: साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; ‘फुले-शाहू-आंबेडकर साहित्य सदना’चे थाटात लोकार्पण
1

Satara News: साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; ‘फुले-शाहू-आंबेडकर साहित्य सदना’चे थाटात लोकार्पण

धडाकेबाज तपास यंत्रणा पण घशाला कोरड! सातारा तालुका पोलीस ठाण्यात प्यायला पाणीच नाही
2

धडाकेबाज तपास यंत्रणा पण घशाला कोरड! सातारा तालुका पोलीस ठाण्यात प्यायला पाणीच नाही

सहकार क्षेत्राला बळकटी! साताऱ्यात प्रशिक्षण सभागृहाचे लोकार्पण; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले राहणार उपस्थित
3

सहकार क्षेत्राला बळकटी! साताऱ्यात प्रशिक्षण सभागृहाचे लोकार्पण; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले राहणार उपस्थित

साताऱ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह; “संविधान हाच सर्वात मोठा ग्रंथ”, प्रा. कांगणेंचे प्रतिपादन
4

साताऱ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह; “संविधान हाच सर्वात मोठा ग्रंथ”, प्रा. कांगणेंचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.