(फोटो सौजन्य – Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, एक व्यक्ती रिंगणात उभा राहून काही खुरापती करण्याच्या विचारात आहे. घटना कोणत्या तरी जत्रेत घडून आल्याचे दिसत आहे. तरुण रील बनवण्यासाठी सज्ज असतो आणि तितक्यातच दुसरा व्यक्ती त्याच्या पायांवर माशीच्या काडीने आग लावून बाजूला होतो. तरुण आग लागलेली असतानाही इतर लोकांकडे पोज करत शोबाजी करुन दाखवतो. पण पुढच्याच क्षणी हवा येते ज्यामुळे ही आग वेगाने त्याच्या संपूर्ण शरीरावर पसरु लागते. तरुणाचा रुबाब लगेच कमी होतो आणि तो घाबरतच ती पेटलेली आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. सुदैवाने यात त्याला काही होत नाही आणि वेळीच ती आग विझवली जाते ज्यामुळे तरुण यातून सुखरुप बाहेर पडतो. तरुणाची फजिती पाहून आता यूजर्सना हसू अनावर झाले असून अनेकांनी या घटनेवर आपल्या मजेदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @lhubhumour नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “इतका आत्मविश्वास तर माझ्यात पण असायला हवा होता” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “म्हणूनच दिखावा कधी करू नये” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ अरे बाळा, आगीसोबत मस्ती नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






