
अलिबाग : मुरुड तालुक्यामधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुरुड तालुक्यामधील एका अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार करून तिच्यावर जबरदस्ती करणार नराधमाला रेवदंडा पोलिसांनी जेरबंद केलं आहे. या प्रकरणाचा सविस्तर पोलिसांनी तपास केल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की, अल्पवयीन दिव्यांग मुलीला धमकावण्यात आले होते की, सदर प्रकार घरच्यांना सांगितल्यास उरण येथील झालेल्या प्रकरणासारखे तुकडे तुकडे करेन अशी धमकी नराधमाने दिली होती, आता या घटनेमुळे परिसरमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गणपत बाळया डोळकर, वय 51, रा. रा. मिठेखार पो वळके मुरुड तालुका असे आरोपीचे नाव आहे.
दिव्यांग असलेली 15 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी ही जुलै २०२४ मध्ये दुपारी १२.३० वाजता सुमारास घरी एकटी असताना गणपत बाळया डोलकर याने तीचा हात पकडुन, जबरदस्तीने तिला त्याच्या घरात घेऊन गेला. तिच्याशी शारीरीक लगट करुन, धमकावत तिला आपल्या घराच्या हॉलमध्ये विवस्त्र करून तीचे डोळे आणि तोंड बांधले आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी जुलै २०२४ महिन्यात दोन ते तीन वेळा पिडीत मुलगी घरात एकटी असताना नराधमाने घरात येऊन घराचे बाथरुमध्ये पिडीत ही कपडे धुत असताना तिच्या शरीराला स्पर्श करीत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यानंतर गावच्या सार्वजनिक विहीरीवर पिडीत एकटी असताना आरोपीने पिडीतेला तिच्यावर जबरदस्ती केली हे आई वडीलांना सांगितले तर मुंबईला उरण येथील महिलेला मारले तसे तुझे तुकडे तुकडे करीन अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने कोणाला काहीही सांगितले नाही.
हेदेखील वाचा – सिलेंडरच्या स्फोटाने कळंबोली हादरली, स्फोटामुळे आजूबाजूच्या घराचं नुकसान
शेवटी हा प्रकार आईच्या लक्षात आल्यावर तिने विचारपूस केल्यावर पीडितेने सर्व प्रकार सांगितला. त्यानुसार सदर पीडित मुलीच्या आईने रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करीत गुरुवारी नराधम गणपत बाळया डोलकर याला अटक केली. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) अधिनियम, 20124 (2), 8,9(K), (1),10,12, भारतीय न्याय सहीता 202364 (2), (I), (K), (M) 74,351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करीत आहेत.