
पुणे हादरलं! बर्फाचा गोळा घेण्याच्या बहाण्याने घरात शिरून मुलींचा विनयभंग; नराधम शिक्षकाला सुनावली 'ही' मोठी शिक्षा
दोन्ही पीडिता शाळेच्या शेजारी राहत होत्या. घरासमोरील कट्ट्यावर त्या बर्फाचा गोळा खात असताना आरोपी शिक्षक तेथे आला. पीडितेच्या घरी बर्फाचा गोळा बनविला जात असल्याची माहिती असल्याने त्याने एका लहान मुलीसाठी बर्फाचा गोळा घेण्याच्या बहाण्याने एका पीडितेला घरात नेले. तेथे त्याने तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग व लैंगिक अत्याचार केला. पीडितेने हा प्रकार आईला सांगितल्यानंतर दुसऱ्या पीडितेनेही आरोपीने तिच्याशी अशाच प्रकारे गैरवर्तन केल्याचे सांगितले. त्यानंतर कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
विशेष सरकारी वकील लालचंद ओसवाल आणि संतोष परदेशी यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे न्यायालयाने आरोपीला चार वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडितांना मदत म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
Ans: फेब्रुवारी 2023 मध्ये मावळ तालुक्यात आरोपी शिक्षक योगेश प्रकाश सोमवंशी (48) याने बर्फाचा गोळा विकत घेण्याच्या बहाण्याने शेजारी राहणाऱ्या 14 वर्षीय दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना घरात नेऊन त्यांचा विनयभंग व लैंगिक शोषण केले. पीडिता घरासमोरील कट्ट्यावर बर्फाचा गोळा खात असताना ही घटना घडली.
Ans: वडगाव मावळ अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी आरोपीला पोक्सो कायद्यान्वये दोषी ठरवून 4 वर्षे सक्तमजुरी आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची संपूर्ण रक्कम पीडित मुलींना मदत म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
Ans: दोन्ही पीडित अल्पवयीन मुलींनी न्यायालयात निर्भयपणे साक्ष दिली. विशेष सरकारी वकील लालचंद ओसवाल आणि संतोष परदेशी यांनी सरकारी पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली. उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे न्यायालयाने शिक्षकाला दोषी ठरवले. फिर्याद कामशेत पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.