! सांगलीतील कवठेमहांकाळ येथे एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न होत आहे. असे असताना लुटपाट करण्यासाठी आलेल्या आरोपींनी विरोध करणाऱ्या सुरक्षारक्षकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास प्रजापतीनगरात घडली. वाठोडा पोलिसांनी खून आणि लूटपाट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली.
कुणाल भैयालाल वानखेडे (वय 20) आणि घनश्याम ऊर्फ अनूप बबली वंजारी (वय 23, दोन्ही रा. भांडेवाडी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या घटनेत एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग आहे. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. लक्ष्मण मुळे (वय 48, रा. भरतवाडा रोड, पारडी) असे हत्या झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरिषकुमार बोराडे यांच्या मार्गदर्शनात बीट मार्शल (पोलिस हवालदार) चंद्रकांत निंबार्ते आणि पोलिस शिपाई किरण गवई हे दोघेही गस्तीवर होते.
हेदेखील वाचा : नवजात अर्भकाची ७० हजार रुपयात विक्री; भंडाऱ्यातील संतापजनक प्रकार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
भांडेवाडी डम्पिंग यार्डच्या सुरक्षा रक्षकाने त्यांना तिघांनी एका डिलिव्हरी बॉयला लुटल्याची माहिती दिली. आरोपी भांडेवाडीच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळाल्याने इतर बीट मार्शल्सना सूचना देण्यात आली. प्रजापतीनगरातील एका निर्माणाधीन इमारतीजवळ एका दुचाकीवर दोघे जण दिसले. अभिलेखावर असल्याने पोलिसांनी त्याला ओळखले. मात्र, तिघेही दुचाकीने पळाले.
लूटमारीच्या उद्देशातून खून
दोन्ही बीट मार्शल्सनी त्यांचा पाठलाग केला. काही पोलिसांनी निर्माणाधीन इमारतीच्या टिनाच्या खोलीत जाऊन पाहिले असता लक्ष्मण रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, आरोपींना तातडीने अटक करण्यात आली.
पंढरपुरात घडली धक्कादायक घटना
दुसऱ्या एका घटनेत, पंढरपुरात एका विवाहित महिलेनं लव्ह अफेअरसाठी प्रियकराच्या मदतीने तिसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचला. ही हत्या फिल्मी स्टाईलने करण्यात आल्याचे समोर आले आहे. या हत्या प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. कोल्हापुरातही खून प्रकरण समोर आले आहे. कणंगला येथे जीवलग मित्राचाच दगडाने ठेचून मित्राने खून केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.