Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: भरदिवसा टाकला दरोडा, समतानगरात खळबळ; गणवेशाच्या टायने बांधले मुलाचे हात-पाय

नागपूरच्या समतानगरमध्ये भरदिवसा धक्कादायक दरोडा पडला. दोन दरोडेखोरांनी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरच्या घरात घुसून अल्पवयीन मुलाचे हात-पाय बांधले व कपाटातून 1.04 लाख रुपये लुटून पलायन केले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 02, 2026 | 03:09 PM
तळेगाव दाभाडे हादरलं ! आईला शिवीगाळ झाली म्हणून थेट तरुणाची हत्याच केली

तळेगाव दाभाडे हादरलं ! आईला शिवीगाळ झाली म्हणून थेट तरुणाची हत्याच केली

Follow Us
Follow Us:
  • दोन दरोडेखोरांनी मागील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला
  • घरात एकट्या असलेल्या मुलाचे हात-पाय व तोंड बांधले
  • कपाटातील 1.04 लाख रुपये लुटून आरोपी फरार
नागपूर: कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समतानगरमध्ये घडलेल्या घटनेने पोलिस विभागात खळबळ उडाली, दोन दरोडेखोरांनी भरदिवसा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टच्या घरात घुसून मुलाचे हात-पाय आणि तोंड बांधून ठेवले आणि कपाटातून १.४ लाख रुपये लुटून पळ काढला. वडील घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

Crime News: भरधाव दुचाकीची सायकलस्वार मजुराला धडक, गंभीर जखमी

कमलेश मासुरकर (३४) हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यांचा मुलगा रोहन (१४), दक्ष (१) आणि मुलगी सौम्या (९) समतानगरमधील घरात राहतात. शनिवारी सकाळी दक्ष आणि सौम्या शाळेत गेले. सकाळी ११ वाजताच्या सुमारास कमलेशही कामावर निघून गेले तर रोहनही शाळेला निधून गेला. दक्ष आणि सौम्या दुपारी १.१५ च्या सुमारास घरी परतले. २ वाजता सौम्या खेळायला बाहेर गेली. दक्ष एकटा टीव्ही पाहत होता.

दरम्यान, दोन दरोडेखोर मागील दाराचे कुलूप तोडून घरात शिरले. दोघांनीही तोंडावर काळे स्कार्फ बांधले होते. एक आरोपी बेडरूममध्ये घुसला तर दुसरा दक्षकडे गेला. त्याने दक्षचे तोंड दाबले आणि त्याला दुसऱ्या बेडरूममध्ये घेऊन गेला, त्याने त्याचे हातपाय शाळेच्या गणवेशाच्या टायने बांधले. त्याला आवाज येऊ नये म्हणून, त्याच्या तोंडावर स्कार्फ बांधला. त्यानंतर दुसरा आरोपी बेडरूममध्ये घुसला. कपाटाच्या लॉकची चावी शोधली, लॉकर उघडून १ लाख ०४ हजार रुपये घेऊन दोघेही पळून गेले.

पायाखालची जमीन सरकली

काही वेळातच कमलेश घरी परतले असता दक्षला खोलीत बांधून ठेवल्याचे समजले. हे पाहून त्यांच्या पायाखालवी जमीन सरकली. चौकशीदरम्यान दक्षने दोन्ही आरोपीनी बांधून ठेवल्याचे सांगितले. कमलेशने तात्काळ नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. कपीलनगर पोलिस घटनास्थळी पोहोचले, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ही घटना आजूबाजूच्या रहिवाशांच्या लक्षात आली नाही, पोलिस आल्यानंतरच रहिवाशांना दरोडा पडल्याचे लक्षात आले. पोलिस आजूबाजूच्या परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज तपासत आहेत.

Solapur Crime: रीलच्या नादात जीव गेला! सोलापुरातील सिद्धेश्वर तलावात १६ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: दरोडा कुठे पडला?

    Ans: नागपूरच्या समतानगर परिसरात, कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत.

  • Que: दरोडेखोरांनी किती रक्कम लुटली?

    Ans: कपाटातून 1 लाख 04 हजार रुपये लुटले.

  • Que: आरोपी घरात कसे शिरले?

    Ans: मागील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

Web Title: Nagpur crime robbery committed in broad daylight causing a stir in samta nagar the boys hands and feet were tied with his school uniform tie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
1

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
2

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला
3

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…
4

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.