Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: पेंचमधील वाघाची शिकार अंगलट; ६ आरोपींना ३ वर्षांचा सश्रम कारावास

पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाला विद्युत प्रवाह लावून ठार मारल्याप्रकरणी ६ आरोपींना दोषी ठरवत न्यायालयाने सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. १० साक्षीदार, ११३ कागदपत्रे व ३७ पुरावे तपासण्यात आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 03, 2026 | 03:04 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पवनी एकसंघ वनपरिक्षेत्रात वाघाची विद्युत प्रवाहाने हत्या केल्याचा गुन्हा सिद्ध
  • ५ आरोपींना ३ वर्षे सश्रम कारावास व १५ हजार दंड; अन्य आरोपींनाही वेगवेगळ्या शिक्षा
  • उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कालमर्यादेत निकाल; १० साक्षीदारांची साक्ष नोंद
नागपूर: पेंच व्याघ्र प्रकल्पातील पवनी एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्रात वाघाला विद्युत प्रवाह लावून ठार मारल्याच्या गंभीर प्रकरणात न्यायालयाने ६ आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा निकाल रामटेक येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. सी. बोरानी यांनी दिला. प्रकरणाचा तपास तत्कालीन क्षेत्रसंचालक ए. लक्ष्मी व डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे व सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर यांनी केला होता. सर्व पुराव्यांसह विहित कालावधीत न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाने निश्चित

कालमयदित निकाल देण्याचे आदेश दिले होते. न्यायालयीन पाठपुरावा उपसंचालक अक्षय गजभिये व सहाय्यक वनसंरक्षक पूजा लिमगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोमेश ठाकरे यांनी पार पाडला. अॅड. मनीषा राऊत व अँड. मोहन भांडेकर यांनी अॅड. ए. के. रानवरे यांनी न्यायालयात विभागाची बाजू मांडली.

मद्यधुंद कारचालकाची अनेक वाहनांना धडक; भरधाव कारने अपघात केला, घराचे गेटही तोडले

१० साक्षीदारांची नोंदविली साक्ष

न्यायालयाने ५ आरोपींना ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास त्यांना ९ महिने कारावासाची शिक्षा सुनावली. शिवाय अन्य कलमान्वये २ वर्षाची साधी कैद व २,५०० रुपयांचा दंड, दंड न भरल्यास एक महिना व २० दिवसांची साधी कैद अशी अतिरिक्त शिक्षा सुनावली. आणखी एका आरोपीस २ वर्षांची साधी कैद व २,५०० रुपयांचा दंड, तर एका आरोपीस ३ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा व १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणात न्यायालयाने एकूण १० साक्षीदारांची साक्ष नोंदविली असून १ ते ११३ क्रमांकाचे दस्तावेज आणि १ ते ३७ साहित्य पुरावे तपासले.

हैदोस घालणारा तडीपार अटकेत

नागपूर शखाचा धाक दाखवून परिसरात हैदोस घालताना बेलतरोडी पोलिसांच्या पथकाने एका तडीपार गुंडाला अटक केली. त्याच्याकडून एक चाकू जप्त करण्यात आला. संदीप भारत वर्मा (२६) रा. महाकालीनगर झोपडपट्टी, बेलतरोडी असे अटकेतील तडीपाराचे नाव आहे. संदीप वर्मा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. परिमंडळ क्र. ४ च्या पोलिस उपायुक्तांनी गतवर्षी जून महिन्यात त्याला नागपूर शहर व ग्रामीणमधून तडीपार केले होते. उल्लंघन करून संदीप नागपुरात परतला होता आणि पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झाला होता. रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास बेलतरोडी पोलिसांचे पथक न्यू मनीषनगर परिसरात गस्त घालत होते. दरम्यान डीपी रोडवरील पेट्रोल पंपसमोर संदीप चाकूच्या धाकावर हैदोस घालताना दिसला.

Nagpur Crime: भयंकर! वर्षभर अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळ, ब्लॅकमेलिंग, अन्…; नागपूरमधील संतापजनक घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रकरण नेमकं काय आहे?

    Ans: पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाला विद्युत प्रवाह लावून ठार मारल्याचा गंभीर गुन्हा.

  • Que: निकाल कोणी दिला?

    Ans: रामटेक येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. सी. बोरानी.

  • Que: शिक्षा काय ठोठावण्यात आली?

    Ans: सश्रम/साधी कैद आणि दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास.

Web Title: Nagpur crime tiger poaching in pench backfires 6 accused sentenced to 3 years of rigorous imprisonment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
1

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
2

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
3

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला
4

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.