Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaykumar Gore News: ‘महिलेच्या आडून मला संपवण्याचा कट…’; जयकुमार गोरेंच्या दाव्याने खळबळ

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर अश्लील फोटो पाठवून विनयभंग केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेला, 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना पोलिसांनी अटक करण्यात आली

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 04, 2025 | 03:23 PM
Jaykumar Gore News: ‘महिलेच्या आडून मला संपवण्याचा कट…’; जयकुमार गोरेंच्या दाव्याने खळबळ
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांच्यांवर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. त्यांनी ते आरोप फेटाळूनही लावले. पण त्यानंतर जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या एका महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना अटक करण्यात आली. संबंधित महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी जयकुमार गोरे यांच्याकडे तब्बल 3 कोटी रुपयांची मागणी केली होती. या मागणीनंतर पोलिसांनी सापळा रचून 1 कोटी रुपयांची पहिली रक्कम स्वीकारताना तिला रंगेहात पकडले. या प्रकरणात आता जयकुमार गोरेंनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे.

जयकुमार गोरे म्हणाले, ज्या महिलेच्या आडून आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बीडप्रमाणे माझ्या विरोधात कट रचला गेला. पण मी पुरावे गोळा केले आणि वाचलो. त्यांचे कट करतानाचे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. बीडमध्ये ज्याप्रकारे घटना घडली त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्लॅन होता. काहीजणांना कायमचे संपवून त्याचे षडयंत्र मी रचण्यापर्यंतचा त्यांचा प्लॅन होता. आताही माझ्याकडे यासंदर्भातले अनेक पुरावे आहेत. या प्रकऱणाचा तपास सुरू आहे. तपास होऊद्या मी त्यानंतर यावर बोलेन.

‘देशाच्या हृदयाचे ठोके…’, अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर अश्लील फोटो पाठवून विनयभंग केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेला, 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना पोलिसांनी अटक करण्यात आली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली होती. संबंधित आरोपी महिला गोरे यांच्याकडे तब्बल 3 कोटी रुपयांची मागणी करत होती,या प्रकरणी गेल्या महिन्यात महिलेला रंगेहात अटक करण्यात आली. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जयकुमार गोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गटातील काही नेत्यांकडून अडकवण्याचा प्रयत्न सुरू होता. ही संपूर्ण कारस्थानपूर्वक रचलेली योजना होती.

म्यानमार भूकंपांनंतरही गंभीर परिस्थिती; विध्वंसानंतर लष्कराने घेतला ‘मोठा’ निर्णय

दरम्यान, या प्रकरणी प्रभाकर देशमुख यांची चौकशी करण्यासाठी पोलिस त्यांच्या घरी दाखल झाले होते. मात्र, ते घरी नसल्याने पोलिसांनी त्यांच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी साताऱ्यात नेण्यात आले आहे. संबंधित महिला प्रभाकर देशमुख यांच्या संपर्कात असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. माझ्याकडे सांगण्यासारखे खूप काही आहे. मात्र पोलीस या प्रकऱणाचा तपास करत असल्याने मी काहीही बोलणार नाही, असंही जयकुमार गोरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर विनयभंगाचे आरोप करणाऱ्या महिलेच्या प्रकरणात नवे वळण आले आहे. या प्रकरणात प्रभाकर देशमुख यांचं नाव पुढे आल्याने सातारा पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन तब्बल तीन तास चौकशी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत देशमुख हे संबंधित महिलेच्या संपर्कात असल्याचं सांगितल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. प्रभाकर देशमुख यांची चौकशी पूर्ण केल्यानंतर पोलीस त्यांच्या घरातून बाहेर पडले असून, आता या प्रकरणात पुढे काय निष्पन्न होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, याबाबत मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली असून, ते म्हणाले, “त्या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. सध्या पोलीस तपास सुरू आहे. त्या तपासाबाबत माझ्याकडे बोलण्यासारखं खूप काही आहे, पण मी आत्ता काही बोलणार नाही. पोलीस त्यांचा तपास करू द्या. या प्रकरणात जे काही सत्य आहे ते बाहेर येईलच, त्यानंतर मी माझी भूमिका मांडेन,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

Web Title: A plot to kill me under the guise of a woman jayakumar gores claim creates a stir nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 03:23 PM

Topics:  

  • Jaykumar Gore

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत : पालकमंत्री जयकुमार गोरे
1

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत : पालकमंत्री जयकुमार गोरे

महाराष्ट्रात 17, तर पुणे जिल्ह्यात 7 नवीन ग्रामपंचायती; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची मोठी घोषणा
2

महाराष्ट्रात 17, तर पुणे जिल्ह्यात 7 नवीन ग्रामपंचायती; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची मोठी घोषणा

Jaykumar Gore News:  कराड तालुक्यातील विकासकामांना गती ; १५ कोटींचा निधी मंजूर
3

Jaykumar Gore News: कराड तालुक्यातील विकासकामांना गती ; १५ कोटींचा निधी मंजूर

Jaykumar Gore News: वारकऱ्यांच्या सोयीसाठी निधी कमी पडू देणार नाही : जयकुमार गोरेंनी स्पष्टच सांगितलं
4

Jaykumar Gore News: वारकऱ्यांच्या सोयीसाठी निधी कमी पडू देणार नाही : जयकुमार गोरेंनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.